आरोन्यनामा ऑनलाईन-Dhaniya Pudina Chutney : जेवणासोबत वाढलेली चटणी जेवणाचा स्वाद वाढवते. अशाच एका चटणीचे नाव आहे कोथेंबिर पुदीना चटणी. ( coriander-mint chutney)ही चटणी टेस्टी आहेच, शिवाय तिच्या सेवनाने अनेक आजारसुद्धा दूर होतात. कोथेंबिर आणि पुदीन्यात अनेक मायक्रो मिनरल जसे की, कॅल्शियल, पोटॅशियम, मॅग्निशियम इत्यादी असते, जे इम्यूनिटी बूस्टरचे सुद्धा काम करते. ही टेस्टी चटणी कशी बनवतात ते जाणून घेवूयात…
कोथेंबिर-पुदीना चटणीचे साहित्य
– पुदीना आणि कोथेंबिरची पाने अर्धा-अर्धा कप
– लसूण पाकळ्या 4-5
– आले 1 तुकडा
– कच्ची कैरी -1
– हिरवी मिरची, चवीनुसार
– मीठ चवीनुसार
– जीरे अर्धा चमचा
– काळे मीठ चवीनुसार
कृती –
सर्वप्रथम पुदीना आणि कोथेंबिर धुवून घ्या. यानंतर यामध्ये सर्व साहित्य मिसळून मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही चटणी हवी तशी घट्ट किंवा पातळ करू शकता.
हे आहेत आरोग्यदायी फायदे
1 इम्यूनिटी वाढते
2 अँटी-बॅक्टीरियल गुणांमुळे पोट निरोगी राहते.
3 आतड्यांच्या समस्या दूर होतात.
4 ताप आणि अतिसारात लाभदायक आहे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.