आरोग्यनामा ऑनलाईन – काहीजणांना विना योक (पिवळा भाग)ची अंडी आवडतात. मात्र, अंड्यांच्या योकमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन व्हाइट पोर्शन पेक्षा अधिक असते. पुरुषांमधील इनफर्टिलिटीची समस्या अंड्याचे योक सेवन केल्यास दूर होऊ शकते. अंड्याच्या योकमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स अधिक असतात. ज्याने फर्टिलिटी वाढते.
अंड्याच्या योकमध्ये कॉपर अधिक असल्याने याच्या सेवनाने पुरुषांमधील टक्कल पडण्याची समस्या कमी होते. अंड्याच्या योकमध्ये प्रोटीन अधिक असल्याने मसल्स मजबूत होतात. हे एब्स बनवण्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन डी अधिक असते. ज्याने हाडे मजबूत होतात. अंड्याच्या योकमध्ये कोलीन असते. जे ब्रेन हेल्दी बनवते. मेमरी तल्लख करते. यामध्ये कॅरोटेनॉइड असते. जे डोळ्यांची शक्ती वाढवण्यात मदत करते.
अंड्याच्या योकमध्ये आयर्न ९३ टक्के असल्याने एनीमिया सारखा आजार होत नाही. यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असल्याने हार्ट अटॅक सारख्या समस्या होत नाहीत. योकध्ये फॉस्फोरस अधिक असते. ज्याने दात मजबूत होतात आणि गम प्रॉब्लमपासून बचाव होतो. अंड्याच्या योकमध्ये व्हिटॅमिन के असल्याने कँसरपासून बचाव होण्यास मदत होते.