पुणे : आरोग्यानामा ऑनलाईन – उन्हाचा तडाखा वाढला आहे. भर उन्हात म्हणजेच दुपारी १० ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडून नये मात्र काही कारणास्तव उन्हात बाहेर पडावे लागल्यास योग्य ती काळजी घ्यायलाच हवी. उन्हाचा तीव्र परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. सेन्सिटिव्ह त्वचेवर तर सूर्याच्या किरणांचा सर्वाधिक परिणाम होतो. अधिक काळ घराबाहेर राहिल्यामुळे हीट एक्झॉशन आणि सनबर्नचा त्रास होऊ शकतो.उन्हामुळे उष्माघात, डिहायड्रेशन आणि हीट एक्झॉशन यासारखे त्रास उद्भवतात.
सनबर्न चा त्रास झाल्यास काय कराल ?
–उन्हाने भाजलेल्या त्वचेसाठी थंड पाण्याचा शॉवर घ्या आणि त्यानंतर त्वचा कोरडी करा. मात्र, हे करताना त्वचेला हळूवार हाताळा. कारण, सनबर्न वेदनादायी असू शकते
–सनबर्न फारच असेल तर व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट घेऊन त्रास कमी करता येईल
–सनबर्नमुळे शरीर डिहायड्रेट होतं. डीहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.
–सनबर्न बरा होण्यास काही अवधी जातो. त्यामुळे बाहेर जाताना त्रास झालेला त्वचेचा भाग कपड्यांनी झाकून घ्या.
–सनबर्नमुळे फोड आले असतील तर, ताप असेल किंवा थंडी भरली असेल तर डॉक्टरांना भेटा
–डोळ्यांनाही सनबर्नचा धेका असतो. त्यामुळे, डोळ्यांच्या संरक्षणासाठी यूव्ही प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस वापरा
उन्हाळ्यात काय घ्याल काळजी ?
–हलके आणि फिक्या रंगाचे कपडे वापरा. त्यामुळे, तुमच्या शरीराचे तापमान वाढू शकते
–सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत बाहेर पडणे टाळा
–उन्हापासून संरक्षण म्हणून स्कार्फ किंवा टोपीने डोके झाकून घ्या. यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहतं
–भरपूर पाणी प्या. शरीराला हायड्रेटेड ठेवा. पाण्याची बाटली कायम सोबत बाळगा
–बाहेर तापमान अधिक असेल तेव्हा बाहेरची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी म्हणजेच ऊन काहीसं कमी असताना करा
–बाहेरील तापमान अधिक असताना पोहणे हा चांगला व्यायाम ठरतो
–तापलेल्या, बंद गाडीत बसू नका, अगदी काही वेळासाठी सुद्धा नाही. गाडीतील तापमान चटकन वाढते.
–उन्हात बाहेर पडताना ३० किंवा अधिक सन प्रोटेक्शन फॅक्टर (एसपीएफ)चा वापर करून त्वचेचे संरक्षण करा. उन्हात बाहेर पडण्याच्या १५ ते ३० मिनिटे आधी सनस्क्रीन लावावं. शिवाय, त्यानंतर दर तासा-दीड तासाने क्रीम लावावं.