आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सौंदर्य टिकवण्यासाठी चेहऱ्याच्या सौंदर्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपले ओठ खूप मऊ असतात. बर्याच मुली यासाठी महाग लिप बाम वापरतात. परंतु, तरीही बर्याच वेळा ते कोरडे, निर्जीव आणि काळे दिसू लागतात. वास्तविक चेहऱ्याप्रमाणे ओठांना देखील स्क्रबिंग आवश्यक आहे. यामुळे ओठांच्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातात आणि ओठ स्वच्छ, मऊ आणि गुलाबी होतात. आपण नैसर्गिक गोष्टींने लिप स्क्रब कसे बनवायचे आणि ते कसे वापरावे जाणून घ्या.
घरीच ‘या’ 5 स्टेपव्दारे सोप्या मार्गानं करा Chocolate Pedicure आणि मिळवा सुंदर पाय
ओठ स्क्रब तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टी
१) साखर – १ चमचा
२) दालचिनी पावडर – १/४ चमचा
३) ऑलिव्ह तेल – १ चमचा
४) मध – १ /२ चमचा
त्वचा उजळण्यासाठी घरी सहजपणे बनवा चारकोल फेशियल, जाणून घ्या
ओठ स्क्रब बनवण्याची आणि लावण्याची पद्धत
१) एका भांड्यात साखर आणि दालचिनी पावडर घ्या.
२) त्यात मध आणि ऑलिव्ह तेल मिसळा.
३) तयार ओठ स्क्रब एअर टाइट कंटेनरमध्ये भरा.
४) आता थोडेसे मिश्रण ओठांवर लावून मालिश करा.
५) ४-५ मिनिटे सोडा.
६) नंतर कोमट पाण्याने स्वच्छ करावे.
फक्त एक महिना दररोज ‘या’ भाजीचं करा सेवन, हैराण करतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या
ओठ स्क्रबचे फायदे
१) कोरड्या, निर्जीव ओठांचे पोषण होईल.
२) मध ओठांना हायड्रेट करेल.
३) साखरेपासून त्वचेचे मृत पेशी काढून टाकल्याने ओठ मऊ आणि गुलाबी होतील.
४) दालचिनी ओठांचे खोल पोषण करेल आणि त्यातील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.
५) अँटी-ऑक्सीडंट गुणधर्मयुक्त दालचिनी, ओठांचा काळेपणा काढून त्वचेच्या मृत पेशी काढून टाकेल.
६) ओलिव्ह ऑइल ओठांवर खोल मॉइश्चरायझिंग करून कोरडेपणा दूर करण्यास मदत करेल.
७) अँटी-ऑक्सिडेंट हे स्क्रब ओठांचा काळपट दूर करेल.
ब्यूटी ट्रेंडमध्ये सर्वत्र दिसतोय लिप मास्क, जाणून घ्या त्याचे फायदे अन् घरच्या घरी बनवण्याची पध्दत
केस दाट, लांब, मजबूत होण्यासाठी ‘हे’ करा !