आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक जणांना बोटे मोडायची खूप सवय असते. त्यांना थोडा वेळ मिळाला की ते लगेच बोटे मोडतात आणि ते अनेकदा ठरवतातही की बोटे मोडायची नाहीत. पण त्यांना बोटे मोडण्याची एवढी सवय जडलेली असते. की त्यांच्याकडून नकळत पणे बोट मोडली जातात. पण बोट मोडणे हे आपल्या शरीरासाठी खूप घातक असतात. हे अनेकांना माहित नसत. पण तुम्ही जर सतत बोटे मोडत असाल तर खाली दिलेली माहिती अवश्य वाचा.
आपल्या शरीरातील प्रत्येक दोन हाडांच्या मध्ये एक लिक्विड असते. त्यामुळे आपल्या हाडांची हालचाल होण्यास मदत होते. हे लिक्विड म्हणजे सायनोव्हायल फ्लुईड असते. हे लिक्विड आपल्या हाडांना एक प्रकारचे ग्रीसिंग करण्याचे काम करते. मात्र जेव्हा आपण बोटे मोडतो. तेव्हा हे लिगामेंट कमी होत जाते आणि हाडे एकमेकांशी रगडू लागतात.
तुम्ही जर सतत बोटे मोडत असाल तर बोटांमध्ये ताण येतो. यामुळे हाडांना जोडणारे लिगामेंटचे सिक्रेशन कमी होऊ लागते. यामुळे हाडे एकमेकांशी रगडू लागतात. याचा परिणाम म्हणजे आर्थरायटिसचे तुम्ही शिकार होऊ शकता.
सतत बोटे मोडल्याने बोटांच्या सांध्यांना सूज येते आणि हे जर तुम्ही वारंवार करत असाल. तर ही सूज अधिकच वाढते. त्यामुळे बोटांना स्पर्श केल्यासही बोटे दुखू लागतात.
तुम्ही अशी सोडू शकता सवय –
१) तुम्हाला जर ही सवय मोडायची असेल तर तुम्ही स्वत:ला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमचे हात फ्री असतील तेव्हा बोटे मोडण्याच्या सवयीने तुम्ही ते करू लागाल.
२) बोटे मोडण्यासाठी तुमचे हात पुढे येऊ नये म्हणून हातात काहीतरी वस्तू ठेवा. यामुळे तुमची बोटे मोडण्याची ही सवय कमी होईल.
३) तुम्ही जर एक आठवडा तुमची बोटे मोडली नाही तर तुमची बोटे मोडण्याची सवय आपोआप कमी होईल.