आरोग्यनामा ऑनलाईन टीम –जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. दिवसातून जास्तीत जास्त दोन कप चहा प्या, असा सल्ला आहारतज्ज्ञ चहाच्या शौकीनांना देतात. परंतु, साखरेचा चहा पिण्यापेक्षा गुळाचा चहा घेतल्यास त्याचे आरोग्याला चांगले फायदे होऊ शकतात. गुळाचा चहा घेतल्याने कोणते फायदे होतात, हे जाणून घेवूयात.
हे फायदे होतात
१) बॉडी डीटॉक्स
गुळाचा चहा नियमित घेतल्यास शरीरातील विषारी घटक नष्ट होतात.
२) शरीराचे तापमान
गुळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
३) फुप्फुसाचा संसर्ग
गुळाचा चहा घेतल्याने गळा आणि फुप्फुसामध्ये झालेला संसर्ग दूर होतो.
४) रक्तातील साखर
थकवा आणि कमजोरी दूर होते. एनर्जी लेव्हल वाढते. गुळ लवकर पचतो, यामुळे साखरेचा स्तरही वाढत नाही.
५) रक्तविकार
रक्तविकार असलेल्या लोकांनी गुळाचा चहा घेतल्यास फायदा होतो.
६) मेटाबॉल्जिम
गुळाचे सेवन शरीरातील रक्त स्वच्छ होते तसेच मेटाबॉल्जिम ठीक राहण्यास मदत मिळते. गुळ रक्तामध्ये लगेच मिसळत नाही आणि यामुळे साखरेच्या तुलनेत गुळ जास्त आरोग्यवर्धक आहे.
७) सर्दी, कफ
गुळ हा उष्ण पदार्थ असल्यामुळे याचे सेवन सर्दी आणि कफमध्ये आराम देते. सर्दीमुळे नाक बंद झाले असल्यास गुळाचा चहा घ्या.