आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरावरील केस आरोग्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर ठरतात. आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की, कोणताही भाग हा विनाकारण तयार झालेला नाही. या भागांची स्वच्छता ठेवण्याचे काम मात्र आपले असते. शरीराच्या प्रत्येक भागाचे एक कार्य आहे. परंतु, सौंदर्यवृद्धी आणि अधुनिकतेच्या नावाखाली छातीवरील, काखेतील तसेच हातापायांवरील केस काढले जातात. शरीरावरील केस हे आरोग्याच्या दृष्टीने कसे उपयोगी आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
आर्मपिटचे केस
शरीराच्या या भागावरील केस कोणालाच आवडत नाहीत, परंतु या केसांमधून एक प्रकारचे केमिकल फेरोमोन्स निघते. यामुळे शरीरातून एका प्रकरचा सुंगध येतो, जो पार्टनरला सेक्शुअली आकर्षित करतो.
नाकातील केस
नाकातील केस थोडेसे जरी वाढले तरी लगेच लोक ते कापण्याच्या मागे लागतात. नाकातील केस श्वासाद्वारे शरीरात जात असलेल्या प्रदूषणाला थांबवतात. हवा या केसांमधून फिल्टर होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. हे केस काढणे अथवा कमी करणे विविध प्रकारच्या इन्फेक्शनचे कारण ठरू शकतात. यामुळे सर्दी-खोकला यासारखे आजार होऊ लागतात. नाकातील केस जन्मापासूनच असतात परंतु यांची इतर केसांप्रमाणे वाढत नाहीत.
डोळ्यांवरील केस
आयब्रो आणि आयलीडमुळे चेहरा सुंदर दिसतो. यामुळे डोळ्यांचे रक्षणही होते. घाम आणि बाहेरील प्रदूषणापासून हे डोळ्यांचे रक्षण करतात. आयब्रो सुंदर दिसण्यासाठी त्यांना आकार दिला जातो. परंतु पापण्यांसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये.
कानातील केस
कानामध्ये किंवा कानावरील केस धूळ आणि प्रदूषणापासून रक्षण करतात. तेच कानामध्ये जास्त केस असल्यास त्यामध्ये मळ निर्माण होतो, ज्यामुळे ऐकू कमी येते. यासाठी वेळच्यावेळी कानातील केस कमी करावेत.
बोटांवरील केस
पायांच्या अंगठ्यावरील केस वॅक्सिंग करताना काढले जातात, कारण यामुळे लुक्सवर प्रभाव पडतो. हे केस काढून टाकल्यास पेरिफेरल आर्टरी डिसीज होण्याचा धोका वाढतो.
छातीवरील केस
हार्मोन टेस्टोस्टेरॉनमुळे केस घनदाट आणि काळे होतात. जर पुरुषांच्या छातीवरील केसांची वाढ कमी असल्यास या हार्मोनची कमतरता असू शकते. परंतु छातीवरील केस कमी असणे म्हणजे याचा अर्थ तुम्ही हेल्दी नाही असाही होत नाही. अनेकवेळा यांची ग्रोथ अनुवंशिकतेशी संबंधित असते.
किरणांपासून रक्षण
शरीरावरील केस भलेही दिसायला चांगले दिसत नसतील, परंतु हे शरीराचे सूर्याच्या हानीकरण अल्टराव्हायलेट किरणांपासून रक्षण करतात. तसेच थंडीमध्ये शरीराला गरम ठेवण्याचे काम करतात. त्वचेचे केसच धूळ, ऊन आणि विविध प्रकारच्या प्रदूषणापासून रक्षण करतात.