आरोग्यनामा ऑनलाईन टीम : जिममध्ये अथवा घरात व्यायाम करताना एखादा सहकारी तुमच्या सोबत असल्यास व्यायाम अधिक चांगला होतो, असे अनेक तज्ज्ञ सांगतात. यामुळेच अनेकजण पार्टनरसोबतच व्यायाम करण्यास पसंती दर्शवतात. अनेक सेलिब्रिटींचेही जिम पार्टनर असतात. परंतु, तुमचा जिम पार्टनर कसा आहे, यावर तुम्हाला जिमचा लाभ किती होणार हे आवलंबून असते, असे तज्ज्ञ सांगतात.
आळशीपणा
अनेक आळशी लोकांना सकाळी आवरून बाहेर पडण्यास उशीर होतो. असा जिम पार्टनर असेल तर त्याची वाट बघण्यात तुमचा वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला उशीर होऊ शकतो. अशा पार्टनरला वेळेचे महत्व पाहून बाय म्हणावे.
गॉसिपींग
काही जिम पार्टनर जिममधील काही गोष्टींचे बाहेर गॉसिपींग करतात. यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच ते जिममध्येही नको त्या विषयांवर तुमच्याशी चर्चा करत बसू शकतात. अशा लोकांसोबत जिमला जावू नये.
सतत स्पर्धा
काही लोकांना सतत स्पर्धा करण्याची, रेस लावण्याची सवय असते. यामुळे तुमच्या शरीरावर व्यायामाचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
जबरदस्ती
काही पार्टनर जिममध्ये व्यायाम करताना तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी जबरदस्ती करू शकतात. ते जास्त व्यायाम करायला भाग पाडतात. असा पार्टनर असेल तर त्यास दूर करा.
फुकटचे सल्ले
काही पार्टनर व्यायामाचे आणि आहाराचे सल्ले देतात. यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता.
टीका-टोमणे
टीका, टोमणे, मस्करी करणारा जिम पार्टनर असल्यास याचा तुमच्या व्यायामावर परिणाम होऊ शकतो.
Visit : arogyanama.com