आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकामध्ये सूज येण्याची समस्या आढळते. बराच काळ एकाच ठिकाणी बसणे अथवा उभे राहिल्यास किंवा हालचाल कमी झाल्याने पाय सूजण्याची समस्या आढळते. त्याचप्रमाणे ह्रदयाचे विकार, किडनी विकार, रक्तवाहिनीमध्ये रक्त गोठणे अशा अनेक समस्यांमध्ये देखील पायाला सूज येण्याचे लक्षणे आढळतात.
१) शारीरिक निष्क्रियता :
दिवसभर बैठे काम करणाऱ्या किंवा दिवसभर कुठलीही हालचाल न केल्याने पायावर सूज दिसून येते.
२) दीर्घकाळ उभे राहणे :
एकाच जागेवर दीर्घकाळ उभे राहिल्यामुळे पायावर सूज येते.
३) लांबचा प्रवास :
खूप लांबचा प्रवास केल्याने अनेकांच्या पायांना सूज येते.
४) शस्त्रक्रिया :
पायांच्या हाडांवर, स्नायूंवर, सांध्यावर शस्त्रक्रिया झाल्यास काहीकाळ सूज येत येते.
५) उष्ण हवामान :
खूप तप्त वातावरणात शारीरिक श्रमाचे काम केल्यास, किंवा खूप चालल्यास किंवा खूप चढ चढल्यास पायांच्या घोट्यावर सूज येते.
६) स्त्रीयांची संप्रेरके :
अनेक स्रियांमध्ये गर्भावस्थेच्या काळातील शेवटच्या काळातील ३ महिन्यात पायावर सूज येते .तसेच काही स्रियांना मासिक पाळींमध्ये किंवा मासिकपाळी पूर्वी पायांवर सूज येते. मासिक पाळी कायमची बंद झाल्यानंतर रजोनिवृत्तीच्या काळात देखील संप्रेरकांच्या उतार चढावा मुळेदेखील अनेक स्त्रीयांच्या पायांवर सूज येते.
७) औषधे :
उच्च रक्तदाबाची काही औषधे, हाडांच्या किंवा सांध्यांच्या विकारात वापरली जाणारी औषधे, वेदनाशामके, मधुमेहाची काही औषधे, कर्करोगतील केमोथेरपी, मूत्र प्रवृत्ती वाढवणाऱ्या औषधांचा अतिरेक,यामुळं देखील पायांवर सूज येते.