आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बीट मध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. यासाठीच आहारात बीटचा समावेश करणे लाभदायक ठरते. बीटचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. बीट हे ब्लड शुगर लेवल कमी करते, सेक्शुअल हेल्थ आणि स्टॅमिना वाढवते, डायबिटीजवर नियंत्रण ठेवते, गर्भवती महीला तसेच कँसरसाठी सुद्धा फायदेशीर आहे. बीटचे आणखी काही फायदे असून त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे आहेत फायदे
हृदविकाराचा धोका कमी होतो
बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, फ्लोवेनॉइड्स आणि बेटासायनिन असते. हे एक शक्तीवर्धक अँटीऑक्सीडंट आहे. हे एलडीएल कॉलेस्ट्रॉलचे ऑक्सीकरण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ते धमन्यांमध्ये जमा होत नाही. यामुळे हृदविकाराचा धोका कमी होतो.
आस्टिओपरोसिस
बीटमधील मिनरल सिलिकामुळे शरीर कॅल्शियमला योग्य प्रकारे वापर करते. दिवसातुन दोन वेळा बीटचे ज्युस प्यायल्याने आस्टिओपरोसिस आणि हाडे व दातांच्या इतर समस्या होत नाहीत.
एनीमिया
हे रक्त वाढवण्यास फायदेशीर असते. एनीमियात सुद्धा हे खाल्ले जाते. बीटमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. आयर्नमुळे हीमाग्लूटनिनि तयार होते. हे ऑक्सीजन आणि अनेक पोषकतत्त्व शरीरात सर्वत्र पोहचवते. बीटमधील हेच आयर्न तत्त्व एनीमियात लाभदायक आहे.
थकवा
बीट थकवा दुर करण्यास मदत करते. याचे नायट्रेट तत्त्व धमन्यांचा विस्तार करण्यास मदत करतात. यामुळे संपूर्ण शरीराला ऑक्सीजन योग्य प्रमात मिळते आणि एनर्जी वाढते. याव्यतिरिक्त बीटमधील आयर्नमुळे स्टॅमिना वाढतो.
बध्दकोष्ठ
बीटमध्ये फायबर असल्याने ते औषधीचे काम करते. यातील नायट्रेट तत्वामुळे पोटातील सर्व टॉक्सिन्स निघुन जातात.
बुध्दी वाढते
नायट्रेट तत्वामुळे बीटचा ज्यूस प्यायल्याने व्यक्तिचा स्टॅमिना १६ टक्क्यांनी वाढतो. शरीरातील ऑक्सीजन वाढल्यामुळे मस्तिष्क सुध्दा योग्यप्रकारे काम करते.