आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सौंदर्य खुलवण्यात मेकअपचा मोठा वाटा असतो. मेकअपकडे एक कला म्हणून बघितले जाते. नेहमीच एकसारखा मेकअप करण्यापेक्षा कधीतरी मेकअप वेगळ्या पद्धतींनी करावा. जरा वेगळ्या पद्धतींनी मेकअप करण्याच्या ट्रिक्स जाणून घ्या
कलरफुल आईलाइनर
मेकअपमध्ये बदल म्हणून डोळ्याच्या मेकअपसाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करू शकता. डोळ्यांना नेहमीच काळ्या रंगांचे आईलाइनर लावले जाते. मात्र कलरफुल आईलाइनरचा वापर करून तुम्ही डोळ्यांचा मेकअप अधिक आकर्षक करू शकता. यामुळे तुमच्या स्टाइलमध्ये नवेपणा येईल.
लिपस्टिक
इतर मेकअप न करता फक्त लिपस्टिक लावून देखील तुम्ही आकर्षक दिसू शकता. नेहमी एकाच रंगाची लिपस्टिक लावत असाल तर लिपस्टिकच्या रंगात तुम्ही बदल करू शकता. साधा मेकअप केला असेल तर ब्राइट कलरची लिपस्टिक लावा. किंवा उठावदार मेकअप केला असेल तर डार्क कलरची लिपस्टिक ट्राय करा.
आयशॅडो
आयशॅडो लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही आयशॅडो लावताना वेगवेगळे प्रयोग करू शकता. तुमचा लुक अधिक खुलवायचा असेल तर
शिमर आणि स्पार्कल्सचा वापर करा. परंतु, हा मेकअप करण्यापूर्वी डोळ्यांखाली लाईट कंसिलर लावा. त्यामुळे डोळ्यांखालील डार्क सर्कल्स, थकवा दिसणार नाही.
कलरफुल मस्कारा
चेहऱ्याच्या सौंदर्यात डोळ्यांच्या मेकअप विशेष भर घालतो. जर तुम्ही कलरफुल मस्कारा वापरत असाल तर बाकी मेकअप साधाच करा.
नेल आर्ट –
नेल आर्ट केल्याने बोटांचे सौंदर्य खुलते. नेहमीच मनीक्युअर करण्यापेक्षा नेल आर्ट किंवा खांना ब्राईट रंगाची नेलपेंट लावा.