आरोग्यनामा ऑनलाईन- कोरोना विषाणूची २०२० मध्ये भीती बाळगून लोक आरोग्याबद्दलच गंभीर बनले. तसेच, रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या औषधाच्या पद्धतीही स्वीकारण्यास सुरुवात केली. लोकांनी सर्व फळ आणि पूरक आहारांवर घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, लोक व्हिटॅमिन-सी Vitamin-C असलेले फळ आणि पूरक आहार याचे सेवन करायला लागले. तज्ज्ञांनी असा दावा केला की ते जीवनसत्व-सी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास प्रभावी आहेत. पण, जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सी Vitamin-C घेणे आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते.
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सी Vitamin-C घेण्याचे दुष्परिणाम काय आहेत ते पाहूया.
उलट्या-अतिसार
जास्त व्हिटॅमिन-सी घेतल्याने अतिसार होऊ शकतो. पोट खराब होते. उलट्या आणि अतिसार वाढू शकतो. बॉडी डिहायड्रेट होऊ शकते.
छातीत जळजळ
छातीत जळजळ होण्याची समस्या व्हिटॅमिन-सी जास्त झाल्यामुळे होते. या अवस्थेत छातीच्या खालच्या आणि वरच्या भागात जळजळ जाणवते. घशात जळजळ होते. ते घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मळमळ
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्यामुळे मळमळ होऊ शकते. फळांमुळे अशा समस्या होण्याची शक्यता कमी आहे. परंतु, व्हिटॅमिन-सी कमी प्रमाणात घ्या.
ओटीपोटात पेटके
जास्त व्हिटॅमिन-सी सेवन केल्याने पेटके येऊ शकतात. म्हणून, एकाच वेळी व्हिटॅमिन-सी उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात वापर करणे टाळा.
निद्रानाश किंवा डोकेदुखी
जास्त व्हिटॅमिन-सी घेतल्यामुळे निद्रानाश आणि डोकेदुखी होऊ शकते. रात्री झोपताना अस्वस्थता वाढू शकते म्हणून रात्री झोपण्यापूर्वी अशा गोष्टी खाऊ नका.
बर्याच अभ्यास तज्ज्ञांनुसार लोकांना दररोज ६५-९० मिलीग्राम व्हिटॅमिन-सी घेण्याचा सल्ला दिला जातो. दिवसाला २००० ग्रॅमपेक्षा जास्त व्हिटॅमिन-सी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. उदाहरणार्थ, संत्र्यात सुमारे १ मिलीग्राम व्हिटॅमिन-सी असते. म्हणजेच, आपण एका दिवसात २ संत्री आरामात खाऊ शकता
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.