आरोग्यनामा ऑनलाईन- डोळे(eyes) येणं ही एका सामान्य बाब आहे. अनेकजण या समस्येला सामोरं जातात. तुम्हीही या समस्येतून जात असाल तर काही खास काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
1) डोळे(eyes) आल्यानंतर इतरांनी वापरलेला साबण, टिश्यू पेपर, टॉवेल, उशी अशा वस्तू वापरू नयेत.
2) कोणताही उपार करताना तो डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावा. तुमच्याच मनानं कोणते औषध किंवा ड्रॉप घेणं टाळावं.
3) सतत डोळ्याला हात लावणं टाळावं.
4) टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशा वस्तूंपासून शक्यतो दूर रहावे. या गोष्टींचा सतत वापर केल्यामुळं डोळ्यांना त्रास होतो.
5) घराच्या बाहेर पडताना गॉगल किवा चष्मा यांचा वापर नक्की करावा. जेणेकरून डोळ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.