आरोग्यानामा ऑनलाईन टीम : फिगरसाठी डायेटींग करणे, उपाशी राहणे, व्यायाम करणे, साखर वज्र्य करणे, असे उपाय नेहमीच केले जातात. परंतु, हे करत असताना काही लोक कृत्रिम स्वीटनरचा वापर करतात. परंतु, हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. कृत्रिम स्वीटनरमुळे लठ्ठपणा, मधुमहे, उच्च रक्तदाब, हृदयरोग इत्यादी आजार होऊ शकतात, असे कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ मॅनिटोबातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
हे लक्षात ठेवा
१ सुक्रोज व स्टेविया यांसारख्या कृत्रिम स्वीटनरचा दैनंदिन जीवनात वाढलेला वापर धोकादायक आहे.
२ कृत्रिम तसेच शरीरासाठी पोषक नसलेल्या स्वीटनरमुळे पचन शक्ती, रोग प्रतिकारक शक्ती व भूकेवर वाईट परिणाम होतो.
३ कृत्रिम स्वीटनरचा वापर केल्याने वजन वाढणे, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयरोग तसेच अन्य शारीरिक आजार होऊ शकतात.
Visit : arogyanama.com