आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्या शरीराच्या त्वचेपेक्षा (Skin) चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. त्यामुळे याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. परंतु बर्याच वेळा मुली काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
बॉडीलोशन
जर आपण चेहऱ्यावर बॉडीलोशन लावत असाल तर ती सवय बदला. आपल्या चेहर्याची त्वचा Skin शरीरापेक्षा मऊ असते. व बॉडी लोशनची घनता अधिक जाड असते. मुरुमांची समस्या उद्भवू शकते. याशिवाय सुगंधामुळे त्वचेचा एलर्जीचा धोका असतो.
हे करा
चेहऱ्यासाठी नेहमी फेस क्रीम आणि त्वचेला सूट होईल असे लोशन खरेदी करा. चेहऱ्यासाठी वापरले जाणारे उत्पादने हलके व नॉन-ग्रीसी असतात.
पैराबेन आधारित उत्पादने
साधारणपणे सौंदर्य उत्पादनांमध्ये फाउंडेशन, बीबीक्रीम, शाम्पू, लोशन इत्यादी मध्ये पैराबेन असते. हे रसायन शरीरातील इस्ट्रोजेनवर परिणाम करते. यामुळे हार्मोन्स असंतुलीत होऊ शकते. तसेच पैराबेन आधारित उत्पादनांमुळे त्वचेची एलर्जी, लालसरपणा, सूज इत्यादींचा धोका असतो.
उत्पादने कशी खरेदी करावी
सौंदर्य उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्याचे लेबल वाचा. त्यात पैराबेन रसायने असल्यास ते विकत घेणे टाळा.
साखर
साखर एक स्क्रब म्हणून वापरली जाऊ शकते. परंतु अधिक जोरदारपणे याचा उपयोग केल्यास त्वचेवर जळजळ, लालसरपणा आणि कोरडेपणा येऊ शकतो.
कसे वापरायचे
जर तुम्हाला हे वापरायचं असेल तर हळूवारपणे चेहऱ्यावर स्क्रब करा.
लिंबू
स्त्रियांना सहसा फेसपॅकमध्ये लिंबू टाकायला आवडते. यामुळे तेलकट त्वचेची Skin समस्या दूर होते आणि चेहर्याचा रंग वाढतो. परंतु हे कधीही थेट तोंडावर लावू नये. मुळात, लिंबामध्ये एक असे रसायन असते जे त्वचेला प्रकाशासाठी संवेदनशील बनवते. यामुळे सूर्यप्रकाशाने होणारा त्वचेचा त्रास आणि त्वचेची इतर समस्या उद्भवू शकतात. तसेच चेहर्यावर कोणतीही इजा झाल्यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते.
कसे वापरायचे
आपण कोणत्याही फेसपॅकमध्ये लिंबू मिसळू शकता.
गरम पाणी
केस व चेहरा गरम पाण्याने धुऊ नका. यामुळे त्वचेत Skin कोरडेपणा येतो. चेहरा निस्तेज, कोरडा आणि ओढल्यासारखा दिसतो. जर आपली त्वचा संवेदनशील असेल तर यामुळे त्वचेवर जळजळ देखील होऊ शकते.
हा उपाय योग्य आहे
कोमट पाण्याने चेहरा धुण्याऐवजी आपण कोमट पाण्याने चेहऱ्यावर वाफ घेऊ शकता. त्वचेची साफसफाई केल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स त्वरीत काढून टाकण्यास मदत होईल.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या
Wab Title : do not apply these things on face