आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Dengue Fever | मागील अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी पूर्ण देशात डेंग्यूची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. डेंग्यू ताप (Dengue fever) डेंग्यू व्हायरसने संक्रमित एडीस मच्छर चावल्याने पसरतो. डेंग्यूच्या तापाचा संसर्ग लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना होतो. याची लक्षणे हलकी ते गंभीर असू शकतात. हा कधी-कधी जीवघेणा सुद्धा होतो. डेंग्यू ताप केव्हा गंभीर होतो ते जाणून घेवूयात…
डेंग्यूचे घातक रूप (Severe dengue) –
डेंग्यूचा संसर्ग चार वेगवेगळ्या स्ट्रेनच्या व्हायरसने (Dengue cases in india 2021) पसरतो. ज्यास सीरोटाइप म्हटले जाते. हे चारही वेगवेगळ्या पद्धतीने अँंटीबॉडीला प्रभावित करतात. स्ट्रेननुसार डेंग्यू घातक रूप सुद्धा घेऊ शकतो. डेंग्यू हेमरेजिक फीव्हर (DHF) आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम (DSS). यांना गंभीर डेंग्यू सुद्धा म्हणतात.
परंतु, डेंग्यूचे हे रूप खुप कमी लोकांमध्ये सापडते. गंभीर डेंग्यू (Dengue mosquito) कुणालाही होऊ शकतो. परंतु याचा सर्वात जास्त धोका मुलांना असतो. प्राथमिक लक्षणे ओळखून योग्य उपचार करून केल्याने मृत्युदर एक टक्केने कमी होतो.
घातक डेंग्यूचे लक्षणे (Symptoms of severe dengue) –
डेंग्यूची सुरुवात जास्त ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या पाठीमागे वेदना, सांधेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना, थकवा, मळमळ, उलटी, त्वचेवर लाल चट्टे आणि भूक न लागणे यासारखी लक्षणे दिसतात. सामान्यपणे 3-7 दिवसानंतर रूग्णात गंभीर डेंग्यूची (Dengue Fever) लक्षणे येऊ शकतात.
जसे की, पोटात वेदना, जोराने श्वास घेणे, सतत उलटी, उलटीत रक्त येणे, लघवीत रक्त येणे, शरीरात द्रव जमणे, हिरड्या आणि नाकातून रक्त वाहणे, लिव्हरमध्ये समस्या, प्लेटलेट काऊंट वेगाने कमी होणे आणि सुस्ती, बेचैनी जाणवणे. अशा स्थिती रूग्णाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.
गंभीर डेंग्यूचा उपचार (Treatment for severe dengue) –
गंभीर डेंग्यूवर कोणताही अचूक उपचार नाही. रूग्णाला आयसीयूमध्ये उपचाराची गरज पडू शकते. लक्षणांच्या आधारावर ब्लड किंवा प्लेटलेट ट्रान्सफ्यूजन, इंट्रावेनस फ्लूईड आणि ऑक्सीजन थेरेपीने उपचार केला जाऊ शकतो. उपचारास उशीर झाल्यास रूग्णाचे अनेक अवयव फेल होऊ शकतात. मृत्यूचा धोका सुद्धा वाढतो.
–
हलक्या लक्षणांच्या डेंग्यूचा उपचार (Dengue treatment) –
– डेंग्यू जास्त गंभीर नसेल तर काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.
– खुप आराम करावा.
– रक्तातील प्लेटलेट्सची नियमीत चाचणी करा.
– पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
– द्रव पदार्थांचे सवेन करा.
– प्लेटलेट वाढवण्यासाठी नारळपाणी सर्वात चांगले आहे.
– आहारात गुळवेल, पपई, कीवी, डाळिंब, बीट आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
– डॉक्टरांच्या संपर्कात राहा.
– प्लेटलेट्सची माहिती डॉक्टरांना देत रहा.
– काही समस्या असेल किंवा प्लेटलेट्स कमी झाल्यास डॉक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला देऊ शकतात.
Web Title :- Dengue Fever | dengue symptoms cases in delhi treatment precaution mosquito
Diet tips | अकाली वृद्धत्व टाळायचे असेल तर अतिशय कमी प्रमाणात खा ‘हे’ 10 पदार्थ; जाणून घ्या
Winter Tips | हिवाळ्यात खोकला-सर्दी-ताप त्रास देत आहे का? ‘हे’ 7 नैसर्गिक फूड देतील आराम