आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकांची नखं धूळ, मातीत न राहतादेखील काळवंडलेली दिसतात. प्रामुख्याने धावपटूंमध्ये ही समस्या आढळते. पण वरवर पाहता साधी वाटणारी ही समस्या अनेक गंभीर समस्यांचे संकेत देते. मग अशी काळवंडलेली नखं कोणत्या समस्यांमधील एक लक्षण आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
१) स्कीन कॅन्सर –
आपल्या नखांखाली एक गंभीर प्रकारच्या स्कीन कॅन्सरची वाढ होत असते. यामुळे आपल्या त्वचेचा रंग बदलू शकतो. या स्कीन कॅन्सरमुळे आपल्याला जास्त वेदना जाणवत नाहीत. त्यामुळे या आजाराकडे अनेकदा दुर्लक्ष होते. नखांच्या पलिकडे क्युटिकल्समध्येही त्वचेचा रंग बदललेला असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.
२) अवजड वस्तू पायावर पडणं –
एखादी जड वस्तू पायावर पडल्यास नखांखालील नसांचे नुकसान होते. नसा फाटल्यास रक्त साखळते. परिणामी नखांचा रंग बदलतो. यामध्ये वेदना जाणवतात. नखाजवळील अशा प्रकारचा रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
३) फंगल टो नेल इंफेक्शन –
नखांना होणार्या इंफेक्शनमुळे त्यांचा रंग बदलण्याचा धोकाही वाढतो. नखांचा रंग निळा, पिवळा, हिरवा किंवा काळासर वाटत असेल त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. फंगल इंफेक्शनच्या तीव्रतेवरून पुढील उपचार ठरवले जातात.
४) पुन्हा पुन्हा त्रास जाणवणं –
लांब धावण्यासाठी फीटेट फूटवेअरचा वापर केल्यास त्याचा त्रास पायांना आणि नखांजवळील भागाला होतो. त्यामुळे खूप घट्ट शूज वापरू नका. सौम्य प्रकारच्या दुखण्यांमध्ये नख वाढतात आणि काळसर भाग काढून टाकता येतो.