आरोग्यनामा ऑनलाईन टीम- आपल्याकडे एक गैरसमज आहे की पुरुषांना स्तन नसतात. म्हणून त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. पण असं नाही ४०० पुरुषांमधून एकाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. महिला आणि पुरुष दोघांनाही ब्रेस्ट टिश्यूज असतात. महिलांमध्ये अनेक प्रकारच्या हार्मोन्सच्या प्रभावामुळे त्यांच्या स्तनांना आकार मिळून ते मोठे होतात. मात्र पुरुषांमध्ये हे हार्मोन नसल्याने पुरुषांचे स्तन अविकसित राहतात आणि छाती सपाट राहते. त्यामुळे आपल्याला वाटते पुरुषांना स्तन नाहीत. त्यामुळे त्यांना कॅन्सरही होऊ शकत नाही. पण पुरुषांनाही स्तनाचा कॅन्सर होतो.
१) अति प्रमाणात केलेल्या मद्यपानामुळे लिव्हरवर परिणाम होतो. आणि स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
२) जसे जसे वय वाढते तसे तसे कर्करोगाची शक्यता सुद्धा वाढत जाते. अनेकदा असे दिसून आले आहे की 68 वर्षांच्या जवळपास असलेल्या पुरुषांमध्ये हा कर्करोग जास्त प्रमाणात होतो.
३) नात्यातील कुठल्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर झालेला असेल तर पुरुषाला सुद्धा तो होण्याची शक्यता असते. महिलांप्रमाणेच पुरुषांच्या रक्ताच्या नात्यातील आजी, आई, बहीण यांना कोणाला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो.
४) लिव्हर सिरोसिस आजारात इस्ट्रोजन हार्मोनचे प्रमाण वाढते. आणि त्या हार्मोनमुळे कर्करोग होण्याची शक्यता सुद्धा वाढते. एवढंच नाही तर इस्ट्रोजन वाढवणाऱ्या पदार्थांचे अति सेवन केल्यास, इस्ट्रोजन वाढवणारे औषध घेतल्यास ते जीन्स ला सक्रिय करतात. आणि स्तनांचा कर्करोग होण्याच्या शक्यता निर्माण करतात.