नासलेल्या दुधाचे पाणी फेकून देऊ नका, ‘हे’ आहेत ६ खास फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काहीवेळा दुध तापवताना अचानक नासते. अशावेळी गृहिणी सर्व दुध फेकून देतात. परंतु, दुध खराब झाले तर टाकून देऊ नका, कारण नसलेल्या दुधाचे पाणी खुप उपयोगी असते. फाटलेल्या दुधापासून ज्याप्रकारे पनीर तयार केले जाते, तसेच नासलेल्या दुधाचे पाणीसुद्धा खूप उपयोगी असते. नासेलेल्या दुधाचे फायदे आणि हे दुध फेकून का देऊ नये याबाबत आपण जाणून घेवूयात.
हे आहेत उपयोग
केसांसाठी फायदेशीर
केसांना शॅम्पू केल्यानंतर नासलेल्या दुधाच्या पाण्याने केस धुवा आणि १० मिनिटानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केस मुलायम आणि चमकदार होतील.
प्राण्यांसाठी
एखादा पाळीव प्राणी असल्यास त्याला जादा प्रोटीन देण्यासाठी त्याच्या खाण्यामध्ये नासलेल्या दुधाचे पाणी मिसळा.
झाडांसाठी
बागेतील झाडांना नासलेल्या दुधाचे पाणी टाकल्यास झाडांना पोषण मिळेल. परंतु हे पाणी स्वच्छ पाण्यामध्ये मिसळून झाडांना टाकावे. कारण हे पाणी अॅसिडीक असल्याने झाडे जाळण्याची शक्यता असते.
पीठ आणि ग्रेव्हीसाठी
पीठ तिंबण्यासाठी आणि गे्रव्ही बनवण्यासाठी पाण्याएवजी नासलेल्या दुधाचे पाणी वापरता येते. हे पाणी टाकलेल्या पिठापासून तयार केलेल्या पोळ्या नरम राहतात. तसेच यामधून प्रोटीनसुद्धा मिळेल. ग्रेव्ही आंबट-गोड बनवण्यासाठी तुम्ही टोमॅटो, अमचुल, चिंच किंवा दह्याचा वापर करत असाल तर याऐवजी नासलेल्या दुधाचा वापर एकदा करा. यामुळे ग्रेव्ही टेस्टी होईल.
उपमा किंवा सूप
नासलेल्या दुधाचे पाणी उपमा करताना टाकल्यास उपम्याची चव आणखीनच चांगली होईल. उपमा टेस्टी बनवण्यासाठी टोमॅटो किंवा दही टाकण्याएवजी नासलेल्या दुधाचे पाणी वापरल्यास उत्तम टेस्ट येते. सूप बनवण्यासाठीसुद्धा या पाण्याचा वापर करता येतो.
सौंदर्य खुलवण्यासाठी
नासलेल्या दुधाच्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल आणि आतून स्वच्छ होते. या पाण्यामध्ये अँटी मायक्रोबियाल गुण असतात जे त्वचेचा कि बॅलेंस संतुलित करतात.
Comments are closed.