आरोग्यनामा ऑनलाइन – सध्या एक जीवघेणा व्हायरस जगभरात रहस्यमय पद्धतीने पसरत आहे. या व्हायरसमुळं होणाया आजारावर सध्यातरी कोणतेही औषध नाही. माणसाचा मृत्यू हाच आजाराचा शेवट आहे. एका माणसाच्या शरीरातून दुसऱ्या माणसाच्या शरीरात हा व्हायरस शिरकाव करतो. या आजाराचं नाव कैंडिडा ऑरिस असे आहे. ताप येणे, अंग दुखणे, शरीराची शक्ती कमी होणे त्याचसोबत इम्यून सिस्टम कमजोर करणे अशी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात सध्या या आजारावर औषधे शोधण्यासाठी संशोधन सुरू आहेत.
आतापर्यंत कैंडिडा ऑरिसने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. या आजारामुळे इम्यून सिस्टम कमजोर होते. या आजाराच्या अहवालानुसार मागच्या वर्षी पहिल्यांदा कैंडिडा ऑरिस हा आजार असलेला रुग्ण ब्रुकलिन येथे सापडला होता. रुग्णालयात उपचार करत असताना एका वयोवृद्ध माणसाच्या रक्ताच्या नमुन्यात हा व्हायरस आढळून आला. यानंतर त्या माणसाला आईसीयूत ठेवण्यात आले. या वृद्धाच्या मृत्यूनंतर कैंडिडा ऑरिस या आजाराचे अनेक रुग्ण निदर्शनास आले.
यूएस आणि यूरोपनंतर आता कैंडिडा ऑरिस आजार आशियाई देशातही पसरु लागला आहे. भारत, पाकिस्तान, आणि दक्षिण आफ्रिका या देशातही हा आजार झालेले रुग्ण आढळले आहेत. मागील पाच वर्षात व्हेनेझुएला आणि स्पेन येथे कैंडिडा ऑरिसचे अनेक रूग्ण सापडले. यामुळं एका ब्रिटिश मेडिकल सेंटरला त्यांचे आईसीयू युनिट बंद ठेवावी लागली होती. कैंडिडा ऑरिस आजारावर औषध नाही. माणसाचा मृत्यूनंतरही हा व्हायरस आजारी रुग्णाचे अंथरून, कपडे यात पसरलेला असतो. कैंडिडा ऑरिस आजार हा सामान्य नागरिकांना माहिती नाही. या आजारावर उपचार करण्यासाठी औषध नाही म्हणून हा आजाराची माहिती लपवून ठेवल्याचंही सांगितले जात आहे.