आरोग्यनामा ऑनलाइन – गर्भातील बाळ आईच्या सर्व गोष्टी ऐकू शकते, त्याच्या आजुबाजूच्या गोष्टी बघूही शकते, अशाप्रकारच्या अनेक गोष्टी मेडिकल सायन्समध्ये सांगितल्या आहेत. या गोष्टी अपणास अविश्वसनीय वाटतात. परंतु, त्या सत्य आहेत. अशाच काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
नॅशलन चाइल्डबर्थ ट्रस्टनुसार, पोटातील बाळ २० आठवड्यांनंतर बाहेरचे आवाज ऐकून प्रतिसाद देते. १३ ते २८ आठवड्याच्या मधल्या काळात बाळ यूट्रीसमध्ये टॉयलेट करुन तेच पितात. तसेच बाळ गर्भात रडते, असेही म्हटले जाते. उंदीर, ससा, गोरिल्ला, कुत्रे, डुक्कर, व्हेल किंवा मनुष्य या सर्वांचा आकार गर्भाच्या सुरुवातीला समान असतो.
आई जे पदार्थ खाते त्या प्रत्येक पदार्थाची चव बाळाला मिळते. प्रेग्नेंन्सीच्या काळात महिलांचे यूट्रीस नॉर्मल साइजपेक्षा ५०० पट मोठे होते. तर ३ महिन्यानंतर बाळाचे फिंगर प्रिंट तयार होतात. बाळाच्या शरीरातील लंग्स हे सर्वात शेवटी डेव्हलप होते. यूट्रीसमधील जास्तीत जास्त लिक्विड हे बाळाच्या मुत्राचे असते.