आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. मनुके खाण्याची सर्वात सोपी आणि चांगली पद्धत म्हणजे रात्रभर ते पाण्यात भिजवून ठेवणे व सकाळी ते पाणी पिणे तसेच फुगलेले मनुके खावे. मनुक्यांमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह असलेल्यांनी मनुके खाऊ नयेत.
मनुके खाण्याचे फायदे –
१) राञभर भिजून ठेवलेले मनुके सकाळी खाल्ल्याने तसेच ते पाणी प्यायल्याने यातील अँटिऑक्सिडेन्ट कन्टेन्टमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व व्हायरस आणि बॅक्टरीयापासून संरक्षण मिळते.
२) मनुक्यांमध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच हायपरटेन्शनची समस्याही दूर करते.
३) यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जास्त असल्याने अॅनिमिया होत नाही व लोहाचे प्रमाण वाढते.
४) मनुका पचनक्रियेस मदत करतं कारण यात मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.
५) मनुक्यांमध्ये फायबर आणि कॅलरी जास्त असल्याने हाड मजबूत होते.