आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रत्येकांची बसण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही लोकांना विशेषत: महिलांना क्रॉस लेग म्हणजेच पायावर पाय टाकून बसण्याची सवय असते. अशाप्रकारे बसणे काहींना आरामदायक सुद्धा वाटते. परंतु, यामुळे शरीर मुळ आकारात रहात नसल्याने याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा पद्धतीने बसण्याचे कोणते दुष्परिणाम आहेत, याविषयी जाणून घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम :-
१ स्पायडर वेन्स – पायाच्या स्पायडर वेन्समध्ये रक्त जमा झाल्याने वेदना आणि सूज येण्याची शक्यता असते.
२ रक्तवाहिन्या – दिर्घकाळ रक्तवाहिन्यांवर दबाव पडल्याने त्या डॅमेज होऊ शकतात.
३ पाठदुखी – सतत पायाची तिढी घालून बसल्याने शरीर नैसर्गिक आकारात राहत नाही. यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
४ पेल्विक बोन – दिर्घकाळ असे बसल्याने पेल्विक बोनमध्ये वेदना होतात.
५ हृदयावर परिणाम – यामुळे पायाच्या रक्तवाहिन्या दबतात. अशावेळी रक्त पायाकडे न जाता पुन्हा हृदयाकडे जाते. याचा हृदयावर वाईट परिणाम होतो.