आरोग्यनामा ऑनलाईन – अचानक वाढू लागणे, इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि लैंगिक जीवनातील स्वारस्य कमी होणे ही थायरॉइडची लक्षणे असू शकतात. थायरॉइडची ही लक्षणे पुरुषांमध्ये दिसून येतात. थायरॉइड ही समस्या केवळ महिलांनाच होते, असा अनेकांचा समज असून तो चुकीचा आहे. पुरुषांनाही हा आजार होऊ शकतो. मध्यम वयातील पुरुषांना तो होण्याची अधिक शक्यता असते. सामान्यपणे थायरॉइड अधिक वय असलेल्यांनाच होतो. पुरुषांमध्ये याचे अपवादही आहेत. हा आजार टाळण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करावी. जास्त ताणतणाव असल्यास एड्रेनल ग्लँड योग्यरितीने काम करत नसल्याने स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टिसोलचे प्रमाण वाढते. याचा परिणाम थायरॉइड ग्लँडवर होतो. थायरॉइड रोखला जाऊ शकत नाही. पण याच्या लक्षणांना ओळखून सुरुवातीलाच उपचारात मदत मिळू शकते.
शरीरात थायरॉइड हार्मोन स्तर कमी होणे म्हणजे हायपोथायराडिज्म आणि जास्त होण्याचा अर्थ हायपरथायरायडिज्म होतो. कमी आयोडिन – रोज १५० मायक्रोग्रॅम आयोडिनची गरज असते. आयोडिनचे प्रमाण कमी झाल्याने हायपोथायरायडिज्म आणि जास्त झाल्याने हायपरथायरायडिज्मचा धोका होऊ शकतो. वाढत्या वयासोबतच इम्युनिटी सिस्टम सुद्धा कमजोर होऊ लागते आणि शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे ३५ वय झाल्यावर थायरॉइड प्रोफाइस टेस्ट आवर्जून करावी. इंटरफेन आणि कॅन्सरच्या उपचारासाठी घेतली जाणारी रेडिएशन थेरपी इत्यादीने थायरॉइड ग्लँडवर प्रभाव पडतो. त्यामुळे थायरॉइड टेस्ट करण्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. जास्त मानसिक ताण असल्याने शरीरात हार्मोनल बदल होत असतात, ज्यामुळे थायरॉइडचा धोका होऊ शकतो. योग, प्राणायाम यावर अधिक फायदेशिर ठरू शकतात. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
थायरॉइड महिलांना दिसून येतो. परंतु, उपलब्ध आकडेवारी पाहिली असता गेल्या काही वर्षात पुरुषांमध्येही या आजाराचे खूपच वाढले आहे. पुरुषांना हा आजार होण्याचा धोका महिलांपेक्षा ८ टक्क्यांनी कमी असला तरी अलिकडे पुरूषांमधील या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. थायरॉइड झाल्यास वजन अचानक वाढू लागते, थकवा व कमजोरी जाणवते, मांसपेशींमध्ये कमजोरी, इरेक्टाइल डिस्फंक्शन, कामेच्छा कमी होणे, अशी लक्षणे पुरूषांमध्ये आढळून येतात. जर कुटूंबात कुणी थायरॉइडने ग्रस्त असतील तर हा आजार होण्याची शक्यता वाढते. थायरॉइडशी संबंधित लक्षण दिसल्यास वेळीच तपासण्या करून घेणे चांगले असते. थायरॉइडसाठी टीएसएच, फ्री टा४ आणि थायरॉइड पेरोक्सीडेज अँटीबॉडीज अशा टेस्ट असून त्याने थायरॉइडच्या ग्रंथींमधील बदल समजतात.