आरोग्यनामा ऑनलाईन – अनेकजण सकाळी उठल्या उठल्या चहा घेतात. सकाळी प्रथम चहा घेतल्यानंतरच अन्य दैनंदिन विधी आणि कामांना सुरूवात होते. अशाप्रकारे बेड टीची सवय असल्यास वेळीच ती बंद केली पाहिजे. कारण ही सवय त्रासदायक ठरू शकते. चहामध्ये कॅफीनसोबतच एल-थायनिन आणि थियोफायलिन असल्याने तात्पुरते ताजतवाने वाटते, परंतु, ते आरोग्यासाठी हानिकारकही आहे. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पित्त रस तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होते. यामुळे मळमळ आणि घाबरल्यासारखे वाटू शकते.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अल्सर आणि हायपर अॅसिडिटी होण्याचा धोका असतो. ब्लॅक टी आरोग्यासाठी चांगला असून वजनही कमी होत असले तरी रिकाम्या पोटी ब्लॅक टी प्यायल्याने पोट फूगते आमि भूकही लागत नाही. रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायल्याने लवकर थकवा जाणवतो. तसेच मूड-स्विंगची समस्याही वाढू शकते. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने स्केलेटल फ्लोरोसिस नावाचा आजार होऊ शकतो. या आजाराने शरीरात आर्थरायटिससारख्या वेदना होऊ लागतात. दिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. आयर्न अब्जॉर्ब केल्याने शरीराची क्षमता कमी होऊ लागते. कॅफीनचे अधिक प्रमाण असल्याने चहाची सवय लागू शकते. जास्त चहा प्यायल्याने पचनक्रियेत समस्या येऊ शकते. त्यामुळे सकाळी रिकाम्यापोटी चहा घेणे टाळले पाहिजे.