आरोग्यनामा ऑनलाईन- अनेकजण वजन वाढेल भीतीनं बटाटा खाणं टाळतात. तसं पाहिलं तर स्वयंपाकघरात बटाट्याचं स्थान महत्त्वाचं आहे. बटाटा खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात, आज याच फायद्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. खास करून बटाट्याच्या सालीचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. याचा वापर कसा करायचा हेही आपण माहित करून घेणार आहोत.
1) हृदयासाठी फायदेशीर – यात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यानं यामुळं हृदयाशी संबंधित आजारांपासून सुटका मिळवता येते. यात ओमेगा -3 फॅटी अॅसिड असतात. त्यामुळं हृदय निरोगी राहण्यास मदत होते. बटाट्याची साल जर पायांच्या तळव्यांना घासली तर यामुळं उष्णता कमी होण्यास मदत होते.
2) त्वचा आणि केस – जर बटाट्याचा रस चेहऱ्यावर चोळला तर यामुळं चेहरा उजळतो. डोळ्यांखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठीही याचा फायदा होतो. बटाट्याच्या साली केसांवर चोळून काही मिनिटांनी चेहरा धुवावा. जर नियमित हा उपाय केला तर केस वाढण्यास मदत होते. बटाट्याची साल वाटून घ्या. यानं त्वचेवर हलक्या हातानं मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळं त्वचा साफ होते. अर्ध्या बटाट्याच्या रसात एका अंड्याचा पांढरा भाग मिक्स करून हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. अर्धा तास ठेवल्यानंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवून घ्या. यामुळं त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते.
3) ऊर्जा मिळते – बटाट्यात व्हिटॅमिन बी 3 असतं. यामुळं कार्बोहायड्रेटचं रूपांतर ऊर्जेत होतं. या घटकामुळं नव्या पेशींचीही निर्मिती होते. स्ट्रेसमुळं पेशींना होणाऱ्या हानीपासून बचाव होतो.
4) कोलेस्टेरॉल – बटाट्याच्या सालीत फायबरचं जास्त प्रमाण असतं. यामुळं कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. लाल रक्तपेशींची कमतरता असणं यास एनिमिया म्हणतात. शरीरात आयर्नची मात्रा कमी झाली तर एनिमिया होतो. बटाटा सालीसकट खाल्ला तर शरीरात आयर्नचं प्रमाण वाढतं.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.