आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरियन मुली दिसण्यात खूप सुंदर आणि आकर्षक असतात. त्यांच्या त्वचेची काळजी घेण्याच्या रूटीनमध्ये त्या रसायनाऐवजी घरगुती वस्तू वापरतात. त्या चेहरा स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी पोषक आणि खनिज समृद्ध असलेल्या तांदळाचे पाणी वापरतात. तुम्हालाही डागरहित आणि चमकदार त्वचा हवी असेल तर करा हे उपाय.
कोरोनामुक्त झालेल्या 20 टक्के रूग्णांना डिस्चार्जनंतर देखील नवीन समस्या, जाणून घ्या
१) क्लीजिंग-
एका भांड्यात एक चमचा तांदळाचे पीठ, एक चमचा कच्चे दुध किंवा दुधाची पावडर आणि एक चमचा तांदळाचे पाणी मिसळावे. गोलाकार हालचालीमध्ये चेहऱ्यावर हे मिश्रण लावून घ्या. दोन-तीन मिनिटे मालिश करत चेहरा पाण्याने स्वच्छ करा.त्यामुळे त्वचेवर जमा झालेली घाण साफ करण्यास मदत होईल. आणि चेहरा स्वच्छ, चमकणारा, मऊ आणि तरूण दिसेल.
बडीशेपपासून बनवा चेहर्यासाठी ‘या’ पध्दतीनं फेसपॅक, काही महिन्यातच त्वचेवर दिसेल ‘तारूण्य’
२) टोनिंग-
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी पाणी फिल्टर करा.नंतर एका भांड्यात तीन चमचे तांदळाचे पाणी आणि तीन-चार चमचे ग्रीन टी मिसळा. तयार मिश्रण स्प्रे बाटलीत भरा आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.याचा वापर आपण दिवसातून दोन-तीन वेळा करू शकता. हे त्वचेला आतून पोषण देईल तसेच चेहऱ्यावरील डाग कमी करतील.
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
३) मॉइश्चरायझिंग-
कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायझिंग करणे फार महत्त्वाचे आहे.हे त्वचेला पोषण प्रदान करते आणि त्यासंबंधित समस्यापासून आराम देते. ते तयार करण्यासाठी एका भांड्यात एक- दोन चमचे तांदळाचे पाणी, कोरफड जेल आणि ग्रीन टी मिसळा.नंतर हलक्या हाताने मालिश करा आणि चेहर्यावर लावा. हे मृत त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यात मदत होते.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या
डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या
रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय