• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ऑफबिट

मोड आलेल्या कडधान्यांचे फायदे पहा; उद्यापासूनच खायला सुरुवात कराल

Support Team by Support Team
February 4, 2019
in ऑफबिट, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ताज्या घडामाेडी, फिटनेस गुरु, माझं आराेग्य, योग, सौंदर्य
0
मोड आलेल्या कडधान्यांचे फायदे पहा; उद्यापासूनच खायला सुरुवात कराल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘मटकीला आले ‘मोडंच मोड’ आजीचं स्वयंपाक फारच गोड ‘ हे बालगीत तुम्हला नक्कीच आठवत असेल. खरय मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी उत्तम असतात. म्हणून पूर्वीच्या काळापासूनच मोडा आलेली कडधान्ये आपल्या जेवणातील महत्वपूर्ण घटक आहेत. मात्र मोड आलेले कडधान्य खाल्ल्यानं नेमकं काय होतं असा प्रश्न तेव्हा तुम्हालाही पडला असेल आणि हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
केस वाढतात
मोड आलेल्या कडधान्यांमुळे केस वाढतात. केसांना कमजोर आणि पातळ बनवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या फ्री-रेडिकलशी लढण्याची क्षमता या मोडांमध्ये असते. तसंच केसांच्या इतर समस्यांवरही मोड फायदेशीर ठरतात.
मेटाबोलिझम सुधारतं
मोडामध्ये असे एन्झाइम असतात ज्यामुळे मेटाबोलिझम सुधारतं. शरीरातील अतिरिक्त फॅट सहजपणे कमी होतं.
वजन कमी होतं
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. या न्यूट्रिएन्टस भरपूर प्रमाणात असतात मात्र कॅलरीज कमी असतात. मोडामध्ये असणारं फायबरमुळे तुमचं पोट भरलेलं राहतं तुम्हाला वारंवार भूक लागत नाही.
त्वचेसाठी फायदेशीर
मोडामधील व्हिटॅमिन बी त्वचेतील ऑईल प्रोडक्शन सुरळीत ठेवतं, ज्यामुळे त्वचा तजेलदार राहते. मोडातील व्हिटॅमिन सी त्वचेची लवचिकता सुधारतं, ज्यामुळे चेहऱ्यावर लाईन्स, रिंकल्स कमी येतात. म्हणून तरुण दिसण्यासाठी मोड आलेले कडधान्य खावेत.
हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं
मोड हे ओमेगा 3 फॅटी असिडचा स्रोत आहे, ज्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. तसंच मोडामध्ये पोटॅशिअम असतं, जे रक्तदाबही कमी करतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
तुम्हाला तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवायची असेल, तर मोडाचा आहारात समावेश करा. मोडातील व्हिटॅमिन ए आणि सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि त्यामुळे इन्फेक्शन तसंच इतर आजारांपासून संरक्षण मिळतं.
कोणती कडधान्य खावीत 
सर्वच प्रकारची कडधान्य पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग व चवळी. नंतर उडीद आणि हरभरा, कडु वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असते. कडधान्यात भरपूर पोशक तत्वे असतात. १०० ग्रॅम कडधान्यामध्ये १७ ते २५ टक्कयापर्यंत प्रथिने असतात याला अपवाद सोयाबीन आहेत. १०० ग्रॅम सोयाबीनमध्ये ४० ते ४२ टक्के प्रथिने असतात. शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पुर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. इंडियन कौंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे एका वर्षात दर माणसी कमीत कमी १७ ते २५ किलो कडधान्य वापरणे आवश्यक आहे. म्हणजे ७० ते ८० ग्रॅम कडधान्य प्रतिदिन प्रति माणसी वापरणे आवश्यक आहे.
प्रथिना व्यतिरिक्त कडधान्यांमध्ये ब जीवनसत्वे, लवणे (खनिज) आणि मेद भरपूर प्रमाणात असतात. १०० ग्रॅम कडधान्यात थायमीन (जीवनसत्व ब-१) रिबोफलेवीन (जीवनसत्व ब-२) ०.१८ ते ०.२६ मिलीग्रॅम आणि नायसीन २.१ ते २.९ मिलीग्रॅम असतात. चुना ७६ ते २०३ मिलीग्रॅम, लोह ७.३ ते १०.२ मिलीग्रॅम, स्फुरद ३०० ते ४३३ मिलीग्रॅम या प्रमाणात असते. सोयाबीन अपवाद आहे. त्यामध्ये १८ ते २० टक्के मेद असते. कडधान्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, लवणे आणि मेद यांची एकत्रीत उपलब्धता हा निसर्गाचा एक चमत्कार आहे आणि म्हणूनच कडधांन्याना आहारामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.

  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021