आरोग्यनामा ऑनलाईन – विविध प्रकारचे पेशंट हाताळताना डॉक्टरांना दररोज कसरतच करावी लागते. अनेकदा अतिशय क्रिटीकल परिस्थितीत रूग्ल येत असतात, अशा रूग्णांना जीवदान देण्याचे काम डॉक्टर करत असले तरी त्यांनाही अशावेळी मानसिक शारीरीक त्रासाला सामोरे जावे लागतेच. कामाचा ताण, मानसिक तणाव याचा आपल्या प्रमाणे डॉक्टरांना सामना करावा लागतो का, याबाबत सव्र्हेक्षण कऱण्यात आले. या सव्र्हेक्षणात असे आढळून आले की, तब्बल ४० टक्के डॉक्टर हे ताण-तणावामुळे झोप येत नसल्याने झोपेच्या गोळ्याचे सेवन करतात.
या सव्र्हेक्षणात मुंबईतील ४० वर्षांवरील मधुमेहतज्ज्ञ, स्त्रिरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन आणि कार्डियोलॉजीस्ट अशा सुमारे १०० डॉक्टरांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ४० टक्के महिला तर ६० टक्के पुरुष होते. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतींमध्ये डॉक्टरांना त्यांची जीवनशैली, कामाचे तास, ताण याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. या सव्र्हेक्षणात असे आढळून आले की, अनेक डॉक्टर कामाच्या ताणामुळे कुटुंबीयांना वेळ देऊ शकत नाहीत. ताण-तणावामुळे डॉक्टरांना पुरेशी झोप मिळत नाही. यामुळे ४० टक्के डॉक्टर्स झोपेच्या गोळ्या घेतात. काही डॉक्टर आठवड्यातील ५ दिवस झोपेच्या गोळ्यांचे सेवन करतात. तर काही डॉक्टरांना तीव्र डोकेदुखीची समस्या आहे. कामात व्यस्त असल्याने अनेकदा डॉक्टरांच्या जेवणाच्या वेळाही चुकत असल्याचे आढळले. डॉक्टरांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.