आरोग्यनामा ऑनलाइन टीम- आपण सर्वच जण आपल्या केसांची निगा राखतो, पण तरी सुद्धा केसांमध्ये काही ना काही समस्या होतात. केसात कोंडा होणे, केसांचे गळणे, केस सफेद होणे इत्यादी. सगळ्यात जास्त जी समस्या होते ती म्हणजे केसात कोंडा होणे. कोंडा म्हणजेच dandruff. कोंडा होणे ही त्वचेची एक स्थिती आहे ज्यात टाळूवरील त्वचेवर पांढऱ्या ते करड्या रंगाचे त्वचेचे थर बनतात. कोंडा आपल्या केसांसाठी हानिकारक असतो. पुरुषांमध्ये कोंड्याची समस्या स्त्रियांपेक्षा जास्त अधिक प्रमाणात आढळून येते. जागतिक पातळीवर, लोकसंख्येच्या सुमारे ५० टक्के लोकांत ही समस्या पाहिली जाऊ शकते. तर आज आपण कोंड्याची लक्षणे, कारणे, निदान उपचार आणि घ्यावयाची काळजी याबाबत जाणून घेणार आहोत.
लक्षणे
१. टाळूवरील त्वचेवर मृत त्वचेचे पांढरे, चिकट पापुद्रे
२. खवले होणे किंवा टाळूवरील त्वचेला खाज सुटणे.
३. अनुपस्थित अथवा सौम्य दाह.
४. डोळ्यांवर, पापण्यांवर आणि कानांच्या मागच्या बाजूस पापुद्रे दिसणे.
५. चरबीसंबधित ग्रंथीतील सिबम स्रावाचे अतिप्रजनन झाल्यास किंवा संचय झाल्याने टाळूवरील त्वचा तेलकट होते.
कारणे
१. सूज किंवा खाजवणारी चिकट त्वचा.
२. शॅम्पूचा अपर्याप्त वापर.
३. मलासेझिया सह बुरशीजन्य संसर्ग.
४. कोरडी त्वचा.
५. केसांच्या उत्पादनाची ॲलर्जी.
६. काही आजार जसे पार्किन्सन रोग आणि एचआयव्ही संसर्ग.
७. पुरुषांमध्ये हार्मोन्स चा प्रभाव.
निदान आणि उपचार
कोंडा हा खवले आणि पापुद्रे असल्यासारखा दिसतो. त्यामुळे सेबोर्हिक डर्माटायटिस, सोरियासिस, अटॉपिक डर्माटायटीस, टिनॅकॅपिटिस इ.सारख्या त्वचेच्या विकारांसारखेच कोंड्याची लक्षणे असतात. म्हणून याचे निदान करणे अवघड होते. मुख्यत्वे निदान रुग्णाचा वैद्यकीय इतिहास बघून आणि शारीरिक परीक्षा करुन करण्यात येते. कधीकधी, त्वचेची बायोप्सी करण्यास सांगितले जाऊ शकते.
कोंडा घालवण्यासाठी सर्वात प्रभावी उपचार म्हणजे शॅम्पूचा आणि टाळूवरील त्वचेच्या उपचारांचा वापर करणे हा आहे. मात्र, हे सर्व उपचार रुग्णांना उपयोगी ठरत नाहीत. जर या उपायांचा उपयोग झाला नाही तर वैद्यकीय स्थितीवर आधारित योग्य अँटी-बॅक्टेरियल (विषाणू प्रतिबंध उपाय) अथवा अँटी फंगल (बुरशी प्रतिबंध उपाय) उपचार करण्यात येतो. अलीकडे लिपोसॉम्स, नियोसॉम्स आणि सॉलिड लिपिड नॅनोपार्टिकल्स सारखे नवीन औषध कोंड्याच्या उपचारासाठी वापरली जात आहेत.
काळजी कशी घेणार
१. केसांची काळजी घेण्यासाठी हर्बल/वनऔषधी तेल लावणे आणि दैनंदिन केस धुणे, ज्यामुळे कोंड्याची वाढ टाळता येईल.
२. शॅम्पूने सातत्याने केस धुणे, कारण टाळूवरील त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त तेल काढून टाकते.
३. केस धसमुसळेपणे विंचरू नका.
४. कोंड्याचे निराकरण होईपर्यंत केस स्टाइल करणे टाळा.
५. कोंड्याच्या प्रभाव कमी करण्यासाठी केसाची उचित काळजी घेण्याची गरज असून हे केल्यानंतर देखील कोंडा कमी होत नसेल तर यासाठी त्रिकोलॉजिस्ट /केस रोगांविषयीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.