लाकडी कंगवा कमी करतो ‘केसाच्या’ तक्रारी
आरोग्यनामा ऑनलाईन टीम : केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक उपाय शोधत असतो. पण जे घरगुती उपाय आहेत. ते आपण कधीच करत नाहीत. खर तर घरगुती उपायचं केसांना जिवंतपणा आणण्याचे काम करतो. त्यामुळे केसांच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर तुम्ही लाकडी कंगव्याचा वापर करू शकता.
लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे खालील प्रमाणे:
१) लाकडी कंगव्याच्या वापरामुळे केसांची वाढ योग्य प्रकारे होण्यास मदत मिळते.
२) लाकडी कंगव्याच्या वापरामुळे केस मजबूत होतात.
३) अनेक जण कोड्यांच्या समस्येमुळे हैराण झालेले असतात. कोड्यांच्या समस्येमुळे केस नाही तर टाळूच्या त्वचेवर परिणाम होतो. यासाठी लाकडी कंगवा वापरणे फायद्याचे ठरते.
४) लाकडी कंगव्याने ओले केस विचारल्यास नेहमीच्या वापरातील कंगव्याच्या तुलनेनं केस कमी प्रमाणात तुटतात.
५) लाकडी कंगव्याच्या वापरामुळे केसांना कोणताही अपाय होत नाही.