आरोग्यनामा ऑनलाईन टीम- पुदिन्याचा वास जरी उग्र असला तरी हाच वास तुम्हाला ताजे टवटवीत देखील बनवून शकतो. पाण्यात काही काळ पुदिना ठेवल्याने पाण्यात पुदिनाची चव आणि गंध उतरतो. या पाण्याचे सेवन केल्यानंतर ताजे वाटते. पुदिन्याचा मोठा प्रमाणात वापर केला जातो. पुदिन्याची जुडी ठेवलेले गारगार पाणी प्यायल्याने मरगळ कुठच्या कुठे पळते आणि ताजे वाटते. म्हणून अनेक ठिकाणी पुदिन्याचे पाणी दिले जाते. तसेच पुदिना हा विविध आजारांसाठीही उपयुक्त आहे.
पुदिन्याचे फायदे खालीलप्रमाणे :
१) पुदिन्याच्या पानांचा ताजा रस, खोकला आणि घसा खवल्यापासून मुक्त होण्यासाठी मदत करतो.
२) पुदिन्याच्या पानांची पेस्ट जखमेवर लावली तर जखम बरी होण्यास मदत होते.
३) अपचन आणि ओटीपोटाची समस्या असेल तर पुदिन्याच्या पानांचा उपयोग केला जातो.
४) तोंडाचा खराब वास येत असेल किंवा हिरड्यांना सूज येत असेल पुदिन्याचा रस फायदेशीर ठरतो.
५) पुदिन्याच्या पानांची पेस्ट अन्नाशी संबंधित कीटकांच्या उपचारांसाठी पुदिन्याचा उपयोग केला जातो.