रक्त वाढीसाठी ‘हे’ घरगुती उपाय करा आणि अशक्तपणा घालवा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो, सतत थकवा जाणवतो. शरीरातील रक्त वाढवण्यासाठी औषोधोपचाराबरोबरच योग्य आहाराची गरज असते. रक्त वाढीसाठी घरगुती उपाय जाणून घेऊयात

मोड आलेली कडधान्ये खा
रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. यामुळे आवश्यक जीवनसत्त्व मिळतात व रक्तवाढ लवकर होते.

लिंबू, मध एकत्र घ्या
ग्लासभर पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये चमचाभर मध एकत्र करून प्या.


सफरचंदाचा ज्युस
दररोज सफरचंदाचा एक ग्लास ज्युस प्या किंवा सफरचंदाच्या ज्युसमध्ये बिटाचा रस आणि मध मिक्स करून घ्या. या मिश्रणात लोहाचे प्रमाण जास्त असते.
तसेच नियमित एक बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

टोमॅटो
टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते. एक ग्लास टोमॅटोचा रस किंवा टोमॅटो सूप पिऊन देखील रक्त वाढ होण्यास मदत होते.

शेंगदाणे आणि गूळ
रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र चावून खा.

खजूर आणि दूध
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दुध आणि खजूर खाणे उत्तम उपाय आहे. रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दुध प्यावे. दुध प्यायल्या नंतर खजूर खावे.

चहा आणि कॉफी कमी प्या
चहा आणि कॉफी पिण्याचे कमी प्रमाणात प्या.