आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Zumba Exercise | झुंबा हा लॅटिन अमेरिकन नृत्य प्रकार असून याच्यात काही बदल करून फिटनेससाठी वापर केला जात आहे. संगीत आणि ग्रुप एक्सरसाइझमुळे तरुणवर्ग झुम्बाकडे आकर्षित होत आहे. मागील काही वर्षांत हा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला आहे. विशेष करून महिला वर्गाचा ओढा झुंबा एक्सरसाईझकडे (Zumba Exercise) सध्या मोठ्याप्रमाणात वाढताना दिसत आहे. विविध शहरातील फिटनेस क्लबमधून झुम्बा क्लासेस घेतले जात आहेत. मात्र, यासाठी मोठी फी सुद्धा आकारली जात आहे.
झुंबा काय आहे
झुंबा हा प्रकार नृत्य आणि एरोबिक्सचे मिश्रण करून तयार करण्यात आला आहे. कोलंबीयातील अल्बट्रो पेरेज हे यांचे जनक असून त्यांनी १९९० मध्ये हा नृत्य प्रकार सुरू केला. स्ट्रेचिंग, बेंडिंग असे विविध शारीरिक व्यायामांनी युक्त अशा स्टेप्स या नृत्य प्रकाराद्वारे केल्या जातात. झुंबा डान्स विशिष्ट अशा संगीतावर केला जातो. एक तास झुंबा केल्यास शरीरातील सुमारे ५०० कॅलरीज बर्न होतात.
झुंबाचे प्रकार
– पाण्यातील झुंबा
– वजन घेऊन केला जाणारा
– स्टेप बोर्डवर केला जाणारा
हे आहेत फायदे
– रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते
– शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते
– वजन कमी होते.
– ह्रदयाचे ठोके सुधारतात.
– शारीरिक तंदुरुस्तीसह मनही प्रसन्न होते.
– झुंबामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
– संगीताच्या तालावर होत असलेल्या झुंबामुळे शरीर सुडौल राहते.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे