• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

मालक तणावात असेल तर ‘कुत्रा’देखील असतो तणावात

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 10, 2019
in ताज्या घडामाेडी
0
dog

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकांना आपल्या पाळीव कुत्र्याशी गप्पा मारण्याची सवय असते. ते आपल्या मनातील अनेक गोष्टी शेअर करतात. कुत्रा आपण जे बोलत आहे ते ऐकतोय असे समजूनच काही लोक त्याच्याशी बोलत असतात. परंतु, कुत्र्याला आपण जे बोलत आहोत ते समजतेय असा समज करूण घेण्याची काही गरज नाही. कारण तुमचा कुत्रा तुमचे केवळ ऐकतच नाही तर तुमच्या भावनादेखील जाणतो. मालक सुखात असेल तर तो सुखात असतो. मालक दु:खात तर तो दु:खात असतो. मालकाच्या भावनांचा कुत्र्याच्या भावनांवर परिणाम होतो. मालक जर तणावात असेल तर कुत्रादेखील तणावात असतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

स्विडिश संशोधकांनी हे संशोधन केले असून ते नेचर्स सायंटिफिकमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी संशोधकांनी ५८ कुत्र्यांच्या अभ्यास केला. यापैकी ३३ कुत्रे शेटलँड शीपडॉग तर २५ कुत्रे बॉर्डर कोललाईज जातीचे होते. यासोबत त्यांच्या मालकांचाही समावेश करण्यात आला होता. मालक आणि कुत्र्यांच्या वागणुकीबाबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नोंद करण्यात आली. याशिवाय वर्षभराच्या कालावधीसाठी त्यांच्यातील कोर्टिसॉल या स्टड्ढेस हार्मोन्सची पातळीदेखील तपासण्यात आली. कुत्र्याच्या कोर्टिसॉलची पातळी तपासण्यासाठी त्यांच्या केसांचे नमुने घेण्यात आले. या संशोधनातून असे दिसून आले की, संपूर्ण वर्षभरात कुत्रा आणि त्यांच्या मालकातील कोर्टिसॉल पातळीत साम्य होते.

उन्हाळ्यात ५७ कुत्र्यांचे आणि हिवाळ्यात ५५ कुत्र्यांचे आणि त्यांच्या मालकाच्या कोर्टिसॉल पातळीत साम्य होते. मालकाच्या कोर्टिसॉल पातळीप्रमाणे कुत्र्यांची कोर्टिसॉल पातळी कमी-जास्त होत होती. तर कुत्र्याची पर्सनॅलिटी आणि त्याच्या शारीरिक कार्यामुळेही या हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम झालेला नव्हता. नर कुत्र्याच्या तुलनेत मादी कुत्रा आणि त्याच्या मालकामध्ये सर्वाधिक घट्ट संबंध असल्याचे या संशोधनातून आढळले. मादी कुत्रा मालकासोबत असताना ऑक्सिटोसिन ज्याला लव्ह हार्मोन्स असे म्हटले जाते, त्याची पातळीदेखील वाढत होती. हा परिणाम नर कुत्र्यात दिसून आला नाही.

Tags: arogyanamaBorder CollolygedoctordogPet dogShetland Sheepdogआरोग्यनामाकुत्राडॉक्टरपाळीव कुत्राबॉर्डर कोललाईजशेटलँड शीपडॉग
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021