आरोग्यनामा ऑनलाईन – ज प्रत्येकास केस गळणे ही समस्या आहे. केस धुताना अर्ध्याहून अधिक केस आपल्या हातात येतात. यामुळे केस कमकुवत आणि पातळ होऊ लागतात. परंतु, सतत केस गळती होण्याची समस्या देखील योग्य नाही. जर आपण बाजाराची सर्व उत्पादने लावत असाल आणि तरीही आपल्याला आपल्या केसांमध्ये कोणताही फरक दिसत नसेल तर हे ६ उपाय करून पाहा. आपल्याला पुन्हा केस गळण्याची समस्या उद्भवणार नाही.
Beauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या
झोपेच्या आधी या ६ गोष्टी करा
१) घट्ट केस बांधून झोपणे
अशा असंख्य मुली आहेत ज्या आपले केस मोकळे ठेवून झोपतात, परंतु लक्षात ठेवा आपण नेहमी आपले केस बांधून झोपावे. आपण घट्ट वेणी बांधली पाहिजे, परंतु आपण पातळ रबर लावणे आवश्यक आहे. यामुळे आपले केस गळणे कमी होतील.
२) हलक्या हातांनी तेलाची मालिश
आजच्या व्यस्त जीवनात स्वत: ची काळजी घेण्यासाठी कोणालाही वेळ नाही. स्त्रिया केसांवर काहीही लावत नाहीत. व्यस्त जीवनशैलीमुळे आपण केवळ केसांना शाम्पू लावतो, परंतु केसांना पोषकद्रव्य देखील आवश्यक असते, म्हणून रात्री झोपायच्या आधी तेल हलके गरम करावे आणि नंतर हलक्या हातांनी मालिश करावी.
तुम्हाला तुमच्या जोडीदाराला ठेवायचंय सदैव आनंदी, ‘या’ गोष्टी करतील तुमची मदत, जाणून घ्या
३) केस विचरणे
सकाळी ऑफिसला जाताना किंवा बाहेर जातानाच आपण केस विचरतो यामुळे अधिक केस गळतात.आपण रात्री झोपायच्या आधी देखील एकदा केस विचरून झोपायला पाहिजे.
४) उशीचे कवर
जर आपण कापसाचे उशीचे कवर वापरत असाल तर आपल्या केसामध्ये अधिक गुंता होऊ शकतो. परंतु जर आपण रेशमी किंवा साटनची मऊ उशी वापरली तर आपल्या केसात कमी गुंता होईल.
मुलांना भूक न लागण्याची कारणे, लक्षणं आणि उपाय, जाणून घ्या
५) तेल लावायचे नसेल तर सीरम लावा
बर्याच मुली रात्री केसांवर तेल लावत नाहीत. बर्याच जणांचा असा विश्वास आहे की रात्रीचे तेल चेहऱ्यावर येते. ज्यामुळे बर्याच वेळा मुरुमांचा त्रास होतो. म्हणून आपल्याला तेल लावायचे नसेल तर आपण हेअर सीरम लावावे.
६) लाकडी कंगवा वापरा
जर तुम्ही रात्री झोपायच्या आधी आपल्या केसांना विचरत असेल तर लाकडी कंगवा वापरा. आपल्या केसांसाठी लाकडी कंगवा अधिक उपयुक्त आहे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
वॅक्सिंग आणि शेव्हिंग नाही, सुंदर पाय दिसण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय
चुकून देखील बाथरूममध्ये ‘ही’ गोष्ट करू नका, होऊ शकता ‘कोरोना’ पॉझिटिव्ह
डागांमुळे त्रस्त असल्यास, होममेड Scar Removal Cream वापरुन पहा
मेंदूवर मलेरियाच्या होणाऱ्या परिणामांचे 100 वर्षे जुन्या गुढाचे वैज्ञानिकांकडून निराकरण
‘अस्थमा’च्या रूग्णांनी त्यांच्या आहारात समाविष्ट कराव्यात ‘या’ 5 गोष्टी, होईल लाभ, जाणून घ्या
वाढत्या वयात देखील जवान दिसाल, फक्त रताळ्यापासून बनवलेले ‘अॅन्टी एजिंग फेसपॅक’ वापरा, जाणून घ्या
मशरूमने करा मुरूमांचा इलाज, घरच्या घरीच बनवा DIY फेसपॅक
शुगर कंट्रोल करणे नाही अशक्य, फक्त हवामानानुसार बदला स्वतःचं रूटीन, जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी खुपच छान आहे Golo Diet, जाणून घ्या याबाबत सर्वकाही
प्रत्येकवेळी पचनक्रिया बिघडते तर एकदा ‘हे’ उपाय करून पाहा, जाणून घ्या