आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक आठवणी आपल्या मेंदूच्या एका कप्प्यात साठवलेल्या असतात. या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात. पण या जुन्या आठवणी सतत काढत राहिल्यास मेंदूसाठी नवीन आठवणी तयार करणे कठीण जाते. यापैकी अनेक आठवणी ह्या काहीही उपयोगाच्या नसतात. उलट त्यामुळे त्रासच जास्त होत असतो. पण, अशा आठवणींपासून सुटका कशी मिळवावी, याविषयी विज्ञान काय सांगते ते जाणून घेवूयात.
अशी आहे पद्धत
1 जुन्या बिनकामाच्या आणि त्रासदायक आठवणी सतत अथवा अधूनमधून उगाळत बसू नका. पुन्हा-पुन्हा या आठवणी काढल्याने त्या फिट होतात.
2 मेंदूच्या न्यूरॉन्समध्ये सिनेप्टिक कनेक्शन निर्माण होते. याच कनेक्शनच्या माध्यमातून गोष्टी मेंदूपर्यंत पोहोचतात. मेदूतील जुन्या आठवणी काढून टाकण्याचे काम ग्लियाल पेशी करतात. या पेशी खराब किंवा कडवट आठवणी काढून टाकू शकतात.
3 ग्लियाल पेशी सक्रिय होण्यासाठी भरपूर झोप घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारे आराम केल्यास ग्लियाल पेशी चांगल्या आणि वाईट आठवणीत फरक करुन खराब आठवणी सिस्टिममधून काढू शकेल. तसेच मेंदूची पूर्णपणे क्लीनिंग प्रोसेसही होते.
4 व्यक्ती झोपल्यानंतर ग्लियाल पेशींसाठी स्पेस निर्माण होण्यासाठी मेंदूतील जवळपास 60 टक्के पेशी आकुंचन पावतात.
5 कामात व्यस्त राहिल्याने मेंदूला नवीन आठवणी तयार करण्यास मदत मिळते. यामुळे जुन्या आठवणी नष्ट होतात.