आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बॉडीक्लॉक आयुष्यभर आपल्यासाठी काम करते. प्रत्येक गोष्टीची सूचना ते आपल्याला देत असते. कधी-कधी प्रवासाला गेल्यानंतर, विमान प्रवास केल्यानंतर किंवा अन्य देशात गेल्यास आपले बॉडीक्लॉक बिघडते. जेट लॅगचा त्रास हा बिघडलेल्या बॉडीक्लॉकचाच परिणाम असतो. या बॉडीक्लॉकवरच आयुष्य कसे आहे ते ठरते. ठराविक वेळेला जाग येणे, ठराविक वेळेला झोप येणे, हे बॉडीक्लॉकमुळेच होते. हे जर बिघडले तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बॉडीक्लॉक व्यवस्थित चालण्यासाठी काय करावे, हे जाणून घेऊया.
बॉडीक्लॉकची अशी घ्या काळजी
१. शरीरालाही थोडी शिस्त लावा.
२. वेळच्या वेळी झोपा आणि उठा.
३. नैसर्गिकपणे जगा.
४. दिवसा जास्तीत जास्त सूर्यप्रकाशात राहा.
५. सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ सूर्यप्रकाशात जा.
६. या सोप्या गोष्टी पाळल्या तर आरोग्य चांगले राहिल. आनंदी आणि उत्साह वाढेल.