आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे काही गंभीर आजार तरूण मुला-मुलींमध्ये आढळून येऊ लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ओबेसिटी, एंग्जायटी, उच्च रक्तदाब, डायबिटीज, डिप्रेशन, हृदयरोग, अस्थमा, दृष्टीदोष, कॅन्सर, या गंभीर आजारांचा समावेश आहे. हे आजार तरूण वयात का होतात, याची कारणे आपण जाणून घेणार आहोत.
आजार आणि कारणे
१) डिप्रेशन
जॉब किंवा अभ्यासाचा ताण, प्रेम प्रकरण, पालकांच्या अवास्तव अपेक्षा यामुळे ही समस्या उद्भवू शकते. यामुळे निराशा, कामात मन न लागणे, झोप न येणे, थकवा, अशक्त वाटणे, चिडचिड होणे आदी आदी लक्षणे दिसून येतात.
२) हृदयरोग
जंक आणि प्रोसेस्ड फूड खाणे, शारीरीक हालचालींचा व व्यायामाचा अभाव, सिगारेट ओढणे, दारू पिणे, ताण तणाव आदीमुळे हृदयरोग होऊ शकतो. यामुळे छातीत सतत डाव्या बाजूला दुखणे, हाता-पायांना मुंग्या येणे, श्वास फुलणे, जिना चढताना दम लागणे, अशी लक्षणे दिसून येतात.
३) अस्थमा
अॅक्टिव किंवा पॅसिव्ह स्मोकिंग, प्रदुषण, अॅलर्जी, प्रोसेस्ड फूड, अॅसिडिटी आदी कारणांमुळे अस्थमासारखा आजार होऊ शकतो. छातीत सिकुडणे, दबाव वाटणे, श्वास फुलणे, घरघरल्या छातीत आवाज होणे, थंडीत त्रास होणे आदी त्रास होतो.
४) दृष्टीदोष
चुकीच्या पद्धतीने वाचण, स्मार्टफोन, कंप्युटरचा अतिवापर, जागरण, सतत टीव्ही पाहणे, यामुळे विविध प्रकारचे दृष्टीदोष होतात. यामुळे चष्मा लागतो.
५) लिव्हरच्या समस्या
अयोग्य आहार, अमली पदार्थांचे व्यसन, मद्यपान आदी कारणामुळे या समस्या होतात. यामुळे अशक्तपणा, थकवा, वजन कमी होणे, श्वासात दुर्गंधी, डोळे आणि त्वचेवर पिवळसरपणा येणे, मळमळ होणे, पोट फुलणे, पोटात दुखणे, डायरिया आदी लक्षणे दिसून येतात.
६) कॅन्सर
धुम्रपान, मद्यपान, जंकफूड, चुकीची जीवनशैली, अमली पदार्थांचे व्यसन, प्रदुषण, रेडियशन आदी कारणामुळे हा गंभीर आजार होतो. प्रत्येक कॅन्सरचे वेगवेगळी असतात. वजन कमी होणे, केस गळणे, पोटात त्रास होणे, अपचन, त्वचेच्या समस्या, खोकला, शिवाय ट्यूमर कॉमन लक्षण आहे.
७) ओबेसिटी
जंक फूड खाणे, शारीरीक हालचालींचा व व्यायामाचा अभाव, थंडपेय पिणे, मानसिक ताणतणाव यामुळे हा आजार होतो. ३० पेक्षा जास्त (बीएमआय) बॉडी मास इंडेक्स, महिलांमध्ये ३५ इंच आणि पुरुषात ४० इंचपेक्षा जास्त कंबर ही याची लक्षणे आहेत.
८) एंग्जायटी
मानसिक ताणतणाव, आहाराची अनियमितता, मद्यपान, धुम्रपान, उच्च रक्तदाब आदी कारणामुळे हा आजार होतो. थंड घाम येणे, जीव घाबरणे, झोपेतून उठून बसणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, तोंड कोरडे पडणे, हात-पाय थरथरणे आदी याची लक्षणे आहेत.
९) उच्च रक्तदाब
चुकीची जीवनशैली, जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड जास्त खाणे यामुळे हा आजार होऊ शकतो. थकवा, घाम येणे, ह्रदयाचे ठोके वाढणे आदी याची लक्षणे आहेत.
१०) डायबिटीज
शारीरीक हालचाली तसेच व्यायामाचा अभाव, फॅटी आणि जंक फूड जास्त खाणे, जास्त चहा, कॉफी, थंडपेये पिणे इत्यादी कारणामुळे हा आजार होतो. थकवा, खाज येणे, जास्त भूक-तहान लागणे, जास्त लघवी लागणे, ही याची लक्षणे आहेत.