आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वयोवृद्धांपेक्षाही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह राहणार्या तरुण पिढीला जास्त एकटेपणा जाणवतो, असे यूनिव्हर्सिटी ऑफ मॅन्चेस्टर आणि ब्रुनेल यूनिव्हर्सिटी (लंडन) ने केलेल्या सर्वेत आढळून आले आहे. अनेकांना वाटते की एकटेपणा सर्वात जास्त हा वयोवृद्धांमध्ये असतो. पण या सर्वेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सर्वेतील निरिक्षणे
1 या सर्वेमध्ये 16 ते 24 वयोगटातील 40 तरुणांनी सांगितले की, त्यांना नेहमीच एकटेपणा जाणवतो. तर 65 ते 74 वयाच्या केवळ 29 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनाही एकटेपणा जाणवतो.
2 सोळा वयापेक्षा अधिक 55 हजार लोकांचा यात समावेश करण्यात आला होता. त्यांना एकटेपणाच्या अनुभवांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते.
3 यातील जास्ती जास्त वयोवृद्ध हे एकटेपणाचे शिकार नाहीत. तर तरुणांमध्ये एकटेपणाची समस्या अधिक आढळली.
4 तरुणांना एकटेपणा यासाठी जास्त जाणवतो की, ते स्वत:ला एक्सप्लोर करण्याच्या वयात असतात.
5 सोळा ते 24 वयोगटातील तरुण आपली ओळख शोधण्यात गुंतलेले असतात.
6 सोशल मीडियावर अधिक वेळ अॅक्टिव राहणारे स्वत:ला अधिक एकटं फिल करतात.
7 एकेचाळीस लोकांनी सांगितले की, एकटे राहणेही अनेकदा चांगले अनुभव देतात.