आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे. एकदा जन्माला आलेली व्यक्ती कधीतरी मरण पावते, हे शाश्वत सत्य आहे. मृत्यू हा भितीदायक असल्याने त्याबाबत कुणी जास्त चर्चा करत नाही. त्यामुळे मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात. मृत्यूबाबत काही गोष्टी अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण आहेत. या रंजक गोष्टी आपण जाणून घेवूयात.
१ मृत्यूनंतर तीन दिवसांत आपल्याला पचनासाठी मदत करणारे शरीरातील इंन्झाइम्स आपले शरीर खायला सुरूवात करतात.
२ मृत व्यक्तींना जमीनीत पुरण्याची पद्धत सुमारे ३५०००० वर्षे जुनी आहे.
३ आतापर्यंतच्या मानवी इतिहासात १०० अब्ज लोक मृत पावले आहेत.
४ अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जेवढ्या हत्या होतात, त्यापेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात.
५ तुमच्या वाढदिवसाला १ लाख ५३ हजार लोकांचा मृत्यू होत असतो.
६ डॉक्टरच्या प्रिस्क्रिपशनवरील खराब अक्षरामुळे दरवर्षी सुमारे ७ हजार लोकांचा मृत्यू होतो.
७ डावखुरे लोक अन्य व्यक्तींच्या तुलनेत तीन वर्षे आधी मरण पावतात.
८ मृत्यू होत असताना व्यक्तीची ऐकण्याची क्षमता सर्वात शेवटी नष्ट होते.
९ अमेरिकेत दर तसाला दारूड्या चालकामुळे एक व्यक्ती मरण पावतो.
१० माऊंट एव्हरेस्ट शिखरावर सध्या सुमारे २०० डेडबॉडीज आहेत. या शिखरावर चढाई करणारांना त्या लॅण्डमार्क म्हणून समोर येतात.
११ दर ४० सेकंदाला एक व्यक्ती सुसाईड करत असतो.
१२ ग्रीक तत्वज्ञ क्रिसिपस यांच्या गाढवाने एकदा दारू प्यायली. या गाढवाला पाहून हासून हासून त्यांचा मृत्यू झाला.
१३ ज्यांचा जन्म १९२३ मध्ये झाला त्या पुरूषांपैकी ८० टक्के पुरूष महायुद्धात मारले गेले.
१४ दर मिनिटाला आपल्या शरीरातील साडेतीन कोटी पेशी मृत होतात.
१५ सुदानमध्ये अजूनही सुळावर चढवून फाशी देण्याची पद्धत आहे.
१६ दरवर्षी केवळ बेडवरून खाली पडल्याने ६०० अमेरिकन नागरिकांचा मृत्यू होतो.
१७ कार अपघातात लठ्ठ चालकाचा मृत्यू होण्याचा धोका ७८ टक्क्यांनी वाढतो.
१८ जगभरात केवळ गरीबीमुळे २० हजार बालकांचा मृत्यू होतो.
१९ आपला जन्म होतो तेव्हा तब्बल २७० हाडे असतात आणि मृत्यू समयी केवळ २०६ असतात.
२० लंडनमध्ये संसद सभागृहात मृत्यू होणे हे बेकायदेशिर आहे.
२१ अमेरिकेत मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेल्या २५ व्यक्तींपैकी एक व्यक्ती निरपराध असतो.
२२ पृथ्वीवरील दर ८ पैकी एका मृत्यू मागे प्रदुषण हे कारण असते.
२३ आतापर्यंत युद्धात मृत पावलेल्यांचा आकडा १५ कोटी ते १ अब्ज आहे.
२४ भारतातील एक आदीवासी जमात जन्म हा एक दुखाचा क्षण तर मृत्यू हा आनंदाचा क्षण म्हणून साजरी करते.