आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत चहा बिस्कीट हे सर्वांचंच खूप आवडत खाद्य आहे. काही महिला तर मुलं रडायला लागली की त्यांच्या हातात बिस्कीट देतात. पण मैद्यापासून बनवलेलं हे बिस्कीट आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. कारण आपल्याला आवडत असलेलं बिस्कीट पाम तेलापासून बनवलं जात. त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
मैद्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ हृदयासाठी घातकच असतात. परंतु, ते कधीतरी खाल्ले जातात. पण बिस्कीट काहीजण रोज खातात. पण रोज बिस्कीट खाणाऱ्यांनी आता सावधानता बाळगायची आहे. कारण तुमचं आवडत बिस्कीट हे तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे.
बिस्किटांमध्ये वापरला जाणारा मैदा हा आपल्या आतड्यावर विपरीत परिणाम करतो. त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते. तसेच या बिस्किटांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या रक्तातील शुगर वाढते. आणि वजनही वाढते. आपण सकाळी-सकाळी चहा बिस्कीट खातो. त्यामुळे आपल्याला अपचनाची समस्या निर्माण होते. रोज आवडीने खाल्या जाणाऱ्या चहा बिस्किटांमुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.