आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केस अनुवंशिकतेमुळे गळतात, असे अनेकांना वाटते. परंतु, केस गळण्यामागे विविध कारणे असतात. केसांसाठी योग्य आहार खूप महत्वाचा असतो. काही पदार्थ असे आहेत की, जे खाल्ल्यामुळे केस गळू शकतात. केस गळत असल्यास हे पदार्थ खाणे प्रथम बंद करावे, त्याशिवाय केस गळती कमी होणार नाही.
तळलेले पदार्थ
जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने डीएचटी लेव्हल वाढते. यामुळे केस गळती वाढते. तसेच केसांची वाढही खुंटते.
डायट सोडा
कार्बोनेटेड पेयांमध्ये अॅसिडची फॉर्मिंग चांगली असते. अॅसिडसोबतच यामध्ये शुगर जास्त असते. यामुळे ब्लडमधील शुगर लेव्हल वाढते. ब्लडमध्ये शुगर लेव्हल वाढल्यामुळे टक्कल पडू शकते.
केक, पेस्ट्री
केक आणि बिस्किट हे पीठ रिफाइन करुन बनवले जाते. यामध्ये अधिक प्रमाणात शुगर आणि लो फायबर असतात. यातील शुगर तणाव सहन करण्याची क्षमता कमी करते. यामुळे केस गळतात.
प्रक्रिया केलेले दूध
प्रक्रिया केलेले दूध पोर्स ब्लॉक करते. यामुळे केस पातळ होतात आणि गळतात.