आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चुकीची जीवनशैली, तणाव आणि चिंता आदी कारणांमुळे हार्ट स्ट्रोकच्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. यांची लक्षणे अनेकांना माहित नसल्याने उपचार करण्यास उशीर होतो. यामुळे जीवन गमाविण्यापर्यंत वेळ येऊ शकते. हार्ट स्ट्रोकमुळे शरीरामध्ये अनेक बदल दिसून येतात. हे बदल ओळखल्यास वेळीच उपचार करणे शक्य होऊ शकते. हार्ट स्ट्रोकची लक्षणे जाणून घेवूयात.
ही आहेत लक्षणे
1 धुरकट दिसणे
शरीराचे सर्व अवयव मेंदूमार्फत नियंत्रित होत असल्याने मेंदू ठिक काम करत नसल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. स्ट्रोक दरम्यान डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते.
2 छातीत दुखणे
छातीत दुखणं हे स्ट्रोक असण्याचं सामान्य लक्षण आहे. अनेकदा गॅस किंवा साधारणे दुखणं समजून या लक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते.
3 जिभेचे व्यंग
हार्ट स्ट्रोकचा परिणाम जिभेवरही दिसून येतो. जिभेचे नियंत्रण मेंदूवर अवलंबून असल्याने असे होते. म्हणून बोलताना त्रास होतो. प्रयत्न केल्यानंतरही बोलता येत नाही.
4 शरीर सुन्न पडणे
शरीर सुन्न पडणे हे हार्ट स्ट्रोकचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत शरीराचा एखादा भाग सुन्न होतो.
5 चेहर्याचा एक भाग निकामी होणे
मेंदूचा एखाद्या भाग प्रभावित झाल्याने चेहर्याची एक बाजू निकामी होते. हावभावांवरही परिणाम होतो. स्ट्रोकमुळे तोंड आणि डोळे प्रभावित होतात.