आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही लोक नेहमी आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेकडे जास्त लक्ष देतात पण मात्र मानेकडे दुर्लक्ष करतात. म्हणून मानेचा भाग काळपट पडण्यास सुरुवात होते. पण फक्त साखरेचा उपयोग करून मानेचा काळपटपणा घालवता येऊ शकतो.
मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी उपाय –
मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी साखर स्क्रब सारखे काम करते. यासाठी दीड चमचा साखर घेऊन मानेवर हळुवारपणे मालिश करा. साखर मानेवर लावण्याआधी मान पाण्याने ओली करा. यामुळे स्क्रब होण्यास मदत होऊ शकतो. साखरेने १५ मिनिट मानेवर स्क्रब करा. यानंतर मान स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे मानेवरील काळपटपणा कमी होतो. हा उपाय नियमित केल्याने चांगला परिणाम पाहायला मिळेल.
याशिवाय साखर पाण्यात उकळून घ्यावी हे मिश्रण थंड झाल्यावर मानेवर या मिश्रणाने ह्ळुवारपणे मालिश करा.
तुम्ही साखरेचा वापर फेसपॅक मध्येही करू शकता. फेसपॅक तयार करताना त्यात साखर मिसळून याचा वापर मानेवर केल्यास चांगला फायदा होतो. याशिवाय हा पॅक चेहऱ्यावर लावल्यानेही चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. याच पद्धतीने हाताच्या कोपऱ्यावरील आणि गुडघ्यावरील काळपटपणाही दूर करता येतो.