आरोग्यनामा ऑनलाइन टीम : शरीरात ब्लड सर्कुलेशन सुरू असेल तरच आरोग्य चांगले राहू शकते. ब्लड सर्कुलेशन प्रक्रिया बिघडण्याची विविध कारणे असून त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी न पिणे, व्यायाम न करणे, अशी अनेक कारणे असतात. वाढत्या वयासोबत ही समस्या वाढू शकते. यावर वेळीच उपाय केल्यास आणि योग्य ती दक्षता घेतल्यास ही समस्या सहज टाळता येते. यावर कोणते उपाय करावेत याविषयी जाणून घेवूयात.
१ जमिनीवर सरळ बसावे. डोक्याला डाव्या आणि उजव्या बाजूला काही सेकंदांसाठी फिरवा. हे किमान दहा वेळा करा.
२ दररोज सकाळी पायी किमान पंचेळीस मिनिटे चालून या. यामुळे पायांच्या मांसपेशी मजबूत होतील. ब्लड सर्कुलेशन चांगले होते.
३ खाली बसून दोन्ही पाय वर उचला. यांनतर पाय क्लॉकवाइज फिरवा. नंतर अँटीक्लॉक वाइज फिरवा.
४ नियमित पोहण्याचा व्यायाम केल्यास ब्लड सर्कुलेशन चांगले होते.
५ पायी चालणे, जागेवर उड्या मारणे, असे व्यायाम केल्याने त्वरित ब्लड सर्कुलेशन सक्रिय होते.
६ उभे राहून शरीराला वरच्या दिशेने ओढा. पुन्हा पायाच्या पंज्यावर सरळ उभे राहा. यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढते.
७ हातांना डोक्याच्या वर घेवून गोल गोल फिरवा. क्लॉकवाइज फिरवा. नंतर अँटीक्लॉक वाइज फिरवा. असे किमान दहा वेळा करावे.
Visit : arogyanama.com