आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण नेहमी ऐकत असतो की जेवणानंतर कोणतेही योग किंवा व्यायाम करता कामा नये. पण असाही एक आसन आहे जे जेवणानंतर केल्याने काहीच नुकसान नाही होत उलट याचे फायदेच होतात. असा हा आसन म्हणजे वज्रासन. जेवणानंतर हे योग केल्याने अन्न पचण्यात मदत होते आणि पोटाचे अनेक आजारही दूर होतात. जाणून घेऊ वज्रासनाची विधी
– सर्वात आधी योगा मैटवर बसून घ्या
– त्यानंतर दोन्ही पाय मागे घेत टाचांवर बसा.
– लक्षात ठेवा पायांचे दोन्ही अंगठे जुळलेले पाहिजे
– पायांच्या तळव्यावर आरामदायी अवस्थेत बसा
– दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा
– या अवस्थेत बसताना ताठ अवस्थेत बसा
– याच अवस्थेत कमीत कमी ५ मिनिटापर्यंत बसा
वज्रासनाचे फायदे
– वजन कमी करण्यात फायदेमंद होते
– मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास कमी होतो
– कफ, तणाव अशा समस्यांना कमी करण्यास लाभदायक ठरते
– शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते
– पायातील दुखण्यांवर उत्तम उपाय आहे
– यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात येते
– या आसनामुळे एकाग्रता निर्माण होण्यास मदत होते