आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एचआयव्हीचा संशय मनातून काढून टाकायचा असल्यास वेळीच चाचणी घेतली पाहिजे. काही लक्षणे आढळून आल्यास घरच्या घरी ओराक्विक किटद्वारे ही चाचणी करता येते. ही पद्धत अतिशय सोपी आहे. यातील स्टिक हिरड्यांमध्ये ठेवून मालिश केल्याने व्यक्ती एचआयव्हीग्रस्त आहे की नाही हे समजू शकते. या किटचा आकार प्रेगनन्सी टेस्ट किट एवढाच असतो.
अशी करा टेस्ट
* क्विक टेस्ट हिरड्यांमध्ये लावले जाते.
* वरच्या व खालच्या भागातील हिरड्यांची मालिश करून योग्य प्रकारे हे हिरड्यांमध्ये लावतात.
* २० मिनिटात परिणाम कळतो.
* टेस्ट स्टीकवर सी लिहून आले तर एचआयव्ही नाही.
* टेस्ट किटवर टी लिहिले असेल तर संबंधीत व्यक्ती एचआयव्ही पॉजिटिव्ह आहे.
९० टक्के परिणाम खरे
अनेक लोकांनी या किटच्या परिणामांवर संशय व्यक्त केला आहे. मात्र, या किटचे उत्पादन करणारी कंपनी ९० टक्के खरे परिणाम येत असल्याचा दावा करते. शिवाय या किटला अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाने मान्यता दिली आहे. किटची किंमत साठ डॉलर म्हणजेच सुमारे साडेतीन हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.