दह्यात आहेत विविध गुणधर्म, आरोग्यासह सौंदर्य खुलवण्यासाठीही लाभदायक

yogurt
July 7, 2019

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दूध आरोग्यासाठी किती लाभदायक आहे, हे आपण सर्वजण जाणतो. तसेच दुधापासून तयार होणारे ताक, दही, तूप, लोणी, पनीर असे विविध पदार्थदेखील शरीरासाठी खूप उपयोगी आहेत. यापैकी दह्याचे शरीरासाठी होणारे फायदे कदाचित तुम्हाला माहितीही नसतील. दह्याचे सेवन केल्यास अनेक आजार आपण दूर ठेवू शकतो. यासाठी आहारात नियमित दही घेणे चांगले असते. दह्यात भरपूर आरोग्यदायी गुण आहेत. दह्यामुळे सौंदर्यदेखील वाढवता येऊ शकते.

दही हे विविध आजारावर गुणकारी आहे. उन्हाचा त्रास झाल्यावर दही सेवन केल्यास आराम मिळतो. दररोज आहारात दही घेतल्यास दात आणि हाडे मजबूत होतात. सर्दीमुळे श्वसननलिकेत होणारा संसर्ग टाळायचा असल्यास दही खावे. हाडे ठिसूळ झाली असल्यास दही खूप गुणकारी ठरते. तसेच वजाइनल इंफेक्शनमध्ये दही खाणे खूप लाभदायी आहे. दररोज दही खाल्ल्यास उच्च रक्तदाब होण्याचा धोका कमी होतो.

दही फक्त आरोग्यासह सौंदर्य वाढवण्यात देखील मदत करते. चेहऱ्यावर दही लावल्यास त्वचा मुलायम होते आणि उजळते. दह्याने चेहऱ्याचा मसाज केल्यास ते ब्लीचप्रमाणे काम करते. त्वचेचा शुष्कपणा कमी होतो. दही, भात खाणे सौंदर्यासाठी खूप चांगले आहे. सनबर्न आणि टॅनिंग सारखा सौंदर्यासंबंधी त्रास झाल्यास दही लावावे. यामुळे त्वचा सतेज होते. दही एक चांगला कंडिशनर असून यामुळे केस मृदू होतात.

दह्यात कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स मुबलक असतात. दुधाच्या तुलनेत दही आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. यात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. त्याचप्रमाणे दह्यात लॅक्टोज, लोह आणि फॉस्फरस सुद्धा चांगल्या संख्येत असते. दह्यामुळे पचन प्रणाली सक्षम होऊन रोग प्रतिकार क्षमता वाढते. पोटासंबंधित आजारात ते उपयोगी ठरते. दह्यात ओवा टाकून पिल्यास अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

‘या’ कारणामुळे येत पुरुषांमध्ये वंध्यत्व