आरोग्यनामा ऑनलाईन टीम – नियमित दही खाल्ल्यास हाडे मजबूत होऊन आरोग्यही चांगले राहते. दह्यातील पोषक द्रव्यांमुळे हाडांचा ठिसूळपणा दूर होतो. हाडांची घनता वाढते. यासाठी वृद्ध महिला, पुरुषांमधील हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण कमी होते.
हे लक्षात ठेवा
१) शरीरातील कॅल्शियम अथवा ‘ड’ जीवनसत्त्वाची मात्रा कमी झाल्यास हाडांची झीज होते.
२) हाडे कमकुवत असल्यास दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घ्यावेत.
३) दही घेण्यामुळे हाडे ठिसूळ होण्याचा धोका ५२ टक्क्यांनी कमी होतो.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)